धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असून जनतेने ही निवडणूक हाती घेतल्याने विजय निश्चित – माऊली कटके
कोरेगाव भिमा (ता.शिरूर) संचालक प्रदीप कंद यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्व समाजघटकांना सोबत घेत कोरेगावला तीन काेटींचा विकासनिधी दिला, तसेच तत्कालीन आमदार बाबुराव पाचर्णे यांनी मतदार संघात सुमारे तीन हजार कोटींची विकासकामे मंजुर करुन आणली, प्रसंगी आमदारकी पणाला लावून नगर रोड सहा पदरीकरणाचे कामही पुर्ण केले, मात्र कधीही त्याचे श्रेय घेतले नाही. सध्या घोडगंगा बंद असला तरीही शेजारील साखर कारखान्यांद्वारे शेतकऱ्यांच्या ऊसाची गैरसोय होवू देणार नाही, शासनाच्या लोकप्रिय योजनांमुळे जनता महायुती सरकारवर खुष आहे, तर महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके हे राष्ट्रीय खेळाडु असून ते कोणत्याही कामात कमी पडणार नाहीत, त्यामुळे त्यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा, असे संचालक प्रदीप कंद यांनी महायुतीचे उमेदवार माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके प्रचंड मतांनी निवडून देण्याचे मतदारांना आवाहन कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील प्रचार सभेत व्यक्त केले..
विधानसभा निवडणुकीतील या लढाईला धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा रंग चढला असून, सामान्य जनतेनेच विजयाची जबाबदारी घेतली आहे,शिरूर मतदारसंघातील नागरिकांमध्ये गेल्या १० वर्षातील रखडलेली विकासकामे, घोडगंगा कारखान्याची समस्या, आणि नागरी समस्यांमुळे असंतोष निर्माण झाला आहे. तसेच येत्या काळात शिरूर-हवेलीत विकासकामांसाठी ५ हजार कोटींचा निधी देण्याचे आश्वासनही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिल्याने शिरुर-हवेलीचा कायापालट होणार असल्याचीही ग्वाही कटके यांनी यावेळी दिली.तसेच खुनशीचे व दहशतीचे वातावरण यामुळे जनतेत मोठी नाराजी व प्रचंड रोष असल्याचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी व्यक्त केले.
माजी संचालक विठ्ठलराव ढेरंगे यांनी राजकारणात आम्ही खूप निवडणुका पहिल्या पण आयुष्यातील पहिली अशी निवडणूक आहे की जी जनतेने हातात घेतलीं मोठ्या मताधिक्याने माऊली कटके यांचा विजय होणार असून शिरूर विधानसभेत महायुतीच्या उमेदवाराचा विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक कोटी रुपयांचा निधी कोरेगाव भीमाला दिला असून विकासाबाबत कायमच सहकार्य केले असल्याचे मत व्यक्त केले.
भव्य फुलांचा हार आणि भव्य स्वागत – कोरेगाव भीमाचे माजी सरपंच विक्रम गव्हाणे यांनी ५०० किलो फुलांचा २१ फूट लांबीचा हार तयार करून कटके यांच्या स्वागत करत शान वाढवली. फुलांचा अभूतपूर्व वर्षाव, फटाक्यांची आतषबाजी, आणि जय महाकालच्या घोषात परिसर जल्लोषाने भरून गेला. “या निवडणुकीत जनतेचे प्रेमच माऊली कटके यांचा विजय करणार असून ही केवळ निवडणूक नसून लोकचळवळ बनली आहे,” असा विश्वास माजी सरपंच विक्रम गव्हाणे यांनी व्यक्त केला.
कोरेगाव भिमा येथे गुलाबी वादळ – शिरूर तालुक्याचे प्रवेशद्वार कोरेगाव भिमा येथे गुलाबी वादळाच्या आपला माणूस श्रावणबाळ माऊली कटके उत्स्फूर्त स्वागत करण्यात आल्याने व महायुतीच्या लोकप्रिय योजनांसह मतदारांचे परिवर्तनाच्या दिशेने पाऊल पडत असून महायुती सरकारच्या विविध लोकहितकारी योजनांच्या आधारावर शिरूर मतदारसंघाचा विकास साधण्याचे आश्वासन दिले असून, माऊली कटके यांच्या विजयाच्या जयघोषासह कोरेगाव भीमातून परिवर्तनाचे बिगुल वाजणार असल्याची चर्चा रंगत आहे.