लोणीकंद (ता.हवेली) पोलीस स्टेशन येथील सहायक पोलीस निरीक्षक चेतन चंद्रकांत थोरबोले (वय ३६ वर्ष) यांनी तक्रारदार यांचेविरुद्ध दाखल अर्जामध्ये निल अहवाल पाठविण्यासाठी व त्यामध्ये तक्रारदार यांना भविष्यात त्रास न होण्यासाठी लोकसेवक चेतन थोरबोले यांनी तक्रारदार यांचेकडे प्रथम ०५ लाखाची मागणी करुन, तडजोडीअंती एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी पंचासमक्ष केल्याचे निष्पन्न झाल्याने वरील प्रमाणे लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे विरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशन येथे अर्ज दाखल होता. सदरचा अर्ज चौकशीकामी वाघोली पोलीस चौकीचे लोकसेवक सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांचेकडे होता. तक्रारदार यांचेविरुद्ध दाखल अर्जामध्ये निल अहवाल पाठविण्यासाठी व त्यामध्ये तक्रारदार यांना भविष्यात त्रास न होण्यासाठी लोकसेवक चेतन थोरबोले यांनी तक्रारदार यांचेकडे ५ लाख रुपयाची लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.

तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता, लोकसेवक सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांच्या विरूध्द दाखल अर्जामध्ये निल अहवाल पाठविण्यासाठी व त्यामध्ये तक्रारदार यांना भविष्यात त्रास न होण्यासाठी प्रथम ०५ लाखाची मागणी करुन, तडजोडीअंती एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी पंचासमक्ष केल्याचे निष्पन्न झाल्याने वरील प्रमाणे लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदर प्रकरणाचा अधिक तपास ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले करीत आहेत.