बी जे एस संस्था छत्रपतींच्या स्वराज्य विचारांची पाईक -पांडुरंग बलकवडे
दिनांक २० फेब्रुवारी
वाघोली ( ता.हवेली) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष व शिवजयंती निमित्त बीजेएस महाविद्यालयातील इतिहास विभाग अंतर्गत हिंदवी स्वराज्याच्या राजधानीची माहिती होण्यासाठी गडकोट वारसा व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेचे उद्घाटन बीजेस प्रबंध समितीचे अध्यक्ष अरुणजी नहार, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष विलास राठोड, प्रबंध समिती सदस्य सुरेश साळुंके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून करण्यात आले.
गडकोट वारसा व्याख्यानमालेत डॉ. पद्माकर गोरे यांचे रायगडचा इतिहास तर अनुक्रमे प्रा. बंडू ब्राह्मणे व श्री.पांडुरंग पवार यांचे अनुक्रमे सिंधुदुर्गचा इतिहास, राजगडचा इतिहास या विषयावर व्याख्याने झाली.
गडकोट वारसा व्याख्यानमालीचा समारोप इतिहास तज्ञ पांडुरंग बलकवडे यांच्या व्याख्यानाने झाला. यावेळी इतिहास तज्ञ बलकवडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा कोणत्या जाती धर्माशी, पंथाशी, राष्ट्राशी नव्हता तर तो मानवतेच्या कल्याणासाठी असून तो नैतिकतेच्या मूल्यांवर आधारलेला होता. तत्कालीन काळात इतर सत्तांकडे नैतिक मूल्यांचा अभाव होता पण येथील हिंदवी स्वराज्यामध्ये नैतिकता असल्यामुळेच येथील लोकांनी आपल्या कुटुंबाचा विचार न करता स्वराज्यासाठी त्यागाची भूमिका ठेवली होती. म्हणूनच हिंदवी स्वराज्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिल्याचे प्रतिपादन केले.
अध्यक्ष मनोगत सुरेश साळुंके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना समृद्ध व प्रगत केल्याने बारा बलुतेदार ही विकसित होत गेला. शेतकरी बारा बलुतेदार आणि अठरापगड जातीच्या लोकांना हिंदवी स्वराज्य टिकले पाहिजे, त्याचे रक्षण केले पाहिजे असे सामान्य लोकांना वाटत होते अशा सामान्यातील सामान्य लोकांमध्ये मध्ययुगीन काळात राष्ट्रवादाची भावना निर्माण करणारा पहिला राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव गौरवाने घेतले जाते असे मत व्यक्त केले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांनी शिवचरित्र घराघरात पोहोचले पाहिजे व शिव विचारांची पिढी निर्माण व्हायला पाहिजे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रम प्रसंगी राजन महाडिक साईनाथ रापतवार, अशोक पवार, पत्रकार निलेश कांकरिया, सुरेश वांढेकर,डॉ माधुरी देशमुख, प्रा. शिवाजी सोनवणे उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ. भूषण फडतरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सहदेव चव्हाण यांनी तर आभार डॉ. एस. व्ही. गायकवाड यांनी मानले.
व्याख्यानमालेचे नियोजन डॉ. भूषण फडतरे, डॉ. सचिन कांबळे,प्रा. बंडू ब्राम्हणे, गिरीश शहा,रामदास आवटे, श्री. विक्रम बस्तापुरे यांनी केले होते.