नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व सेवेसाठी कटिबध्द राहणार – अनिल सातव
वाघोली (ता.हवेली) येथे रस्त्याची झालेली दुरवस्था,नागरिकांचे होणारे अपघात, शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास, सतत जॅम होणारे ट्रॅफिक व नागरिकांना सतावणारी अपघाताची भीती यातून नागरिकांच्या अडचणींना सोडवण्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे हवेली तालुकाध्यक्ष अनिल सातव यांनी स्वखर्चाने रस्त्याची दुरुस्ती करत सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केल्याने नागरिकांनी अनिल सातव यांचे आभार मानले.
वाघोलीतील फुलमळा रोडवरील मसाला कंपनीमागील मातोश्री पार्क, गणराज पार्क, साई पार्क, गोल्डन रेसीडेन्सी, इन्फिनिटी रेसीडेन्सी, आणि श्री पार्क या भागातील नागरिकांना सतवणर्या व अपघातास कारणीभूत असणाऱ्या मुख्य रस्त्याच्या अत्यंत खराब स्थितीमुळे अनेक अपघात घडत होते आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत, अनिल सातव व मित्रमंडळींनी स्वखर्चाने या रस्त्यावर मुरूम टाकून आणि जेसीबीच्या मदतीने रस्ता सपाट करून घेतला आहे. या कामामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना आता सुरक्षिततेचा अनुभव मिळेल.
आगामी काळात, या रस्त्याची पक्की दुरुस्ती PMC कडून करण्यात येईल आणि स्ट्रीट लाईट्स लावण्यात येतील, जेणेकरून रस्त्यावर रात्रीच्या वेळेसही सुरक्षितता सुनिश्चित केली जाईल तसेच नागरिकांशी संवाद साधत आणखी जास्तीत जास्त विकासात्मक काम करणार असल्याचे असे भाजपा युवा मोर्चाचे हवेली तालुकाध्यक्ष अनिल सातव यांनी सांगितले.