वाघोली (ता.हवेली) सारथी पुणे व एमकेसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम या शासकीय योजनेअंतर्गत, मराठा व कुणबी १८ ते ४५ वर्षांपर्यंतच्या १० पास उमेदवारांना MKCL च्या जागतिक अद्यावत अभ्यासक्रमासह मोफत कॉम्प्युटर डिप्लोमा कोर्सचे प्रशिक्षण नॅशनल कॉम्प्युटर टायपिंग ब्युटी अँड फॅशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये दिले जाणार आहे. (SARATHI,MKCL)
यामध्ये रोजगारक्षम चार अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना निवडता येणार असून यातून मोठा रोजगार निर्मितीचे ध्येय ठेवून राज्यभर MKCL व सारथी यांच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. यासाठी महाराष्ट्रातील रहिवाशी मराठा व कुणबी उमेदवारांनी वाघोली येथील केंद्रास भेट देऊन अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.(SARATHI,MKCL)
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र -किमान दहावी पास गुणपत्रक/प्रमाणपत्र.,उत्पन्नाचा दाखला मागील ०३ वर्षचा (३१मार्च २०२५पर्यंत वैध/नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र.,शाळा सोडल्याचा दाखला.,तहसीलदार यांचे (महाराष्ट्र राज्य रहिवाशी असल्याचे प्रमाणपत्र (Domicile Certificate).,आधारकार्ड, उमेदवाराचा फोटो.
संपर्क: 9158236868 / 9545458080
नॅशनल कॉम्प्युटर नगर रोड, अक्सिस बँकच्या वर, वाघोली.
वाघोली परिसरातील आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून वाघोली परिसरात रहाणारे मराठा आणि कुणबी यांनी योजनेत सहभाग नोंदवावा असे आवाहन संस्थेचेप्रमुख प्रल्हाद वारघडे (पाटील) यांनी केले आहे. (SARATHI,MKCL)