सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल
लोणीकंद (ता.हवेली) नुकतेच चार महिन्यांपूर्वी लग्न झाले असताना माहेरी गेलेली पत्नी नांदायला येत नसल्याने तसेच सासरकडच्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने पती रियाज मोमंद मुल्ला (वय २९, रा. एस टी कॉलनी, वाघोली) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. हा प्रकार त्याच्या राहत्या घरी शनिवारी सकाळी घडला.
याबाबत शमीन मोहमंद मुल्ला (वय ५४, रा. एस टी कॉलनी, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सासरे मुजीब बाबु शेख, सासू शाहीर शेख, आज्जे सासरे चाँद मौल्ला शेख, पत्नी सुफी रियाज शेख, मेव्हणी सना उस्मान शेख, मेहरुन शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Lonikand Police Station)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाज मुल्ला हा कॅबचालक होता. त्याचे एप्रिल २०२४ मध्ये सुफी यांच्याबरोबर विवाह झाला होता. लग्नानंतर सासरकडील लोकांनी रियाज याला वेळोवळी शिवीगाळ दमदाटी केली. त्यांची पत्नी माहेरी गेली ती परत नांदायला आली नाही. तिने नांदायला यावे, यासाठी रियाज गेला असताना त्याला अपमानास्पद वागणूक दिली. या सततच्या त्रासाला कंटाळून रियाज याने शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. लोणीकंद पोलीस अधिक तपास करीत आहेत.