उरुळी कांचन येथे प्रचंड वाहतुक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा..वाहतूक पोलिसांच्या गलथान कारभाराने नागरिक हैराण

स्वराज्य टाइम्स न्यूज

एलाईट चौकापासुन दोन्ही बाजुने विरुद्ध दिशेला जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी

बेशिस्त वाहन चालकांवर होणार का कारवाई ?ऐन दिवाळीत  उरुळी कांचन येथील वाहतुक कोंडीचे रेकोर्ड ब्रेक, चार ते पाच किलोमीटर रांगाच रांगा

प्रतिनीधी : नितीन करडे

उरुळी कांचन (ता.हवेली) येथील वाहतुक पोलीसांच्या ढिसाळ कारभारामुळे पुणे सोलापुर महामार्गावर वाहनांच्या  लांबच लांब रांगा लागल्याने  ऐन दिवाळी सणाच्या पाडवा व भाऊबीज सणाच्या मुहुर्तावर उरुळी कांचन येथील एलाईट चौक येथे बेशिस्त वाहनचालक व वाहतूक पोलिसांच्या नियोजन शुण्यतेमुळे  दोन्ही बाजुने वाहने सोलापुरच्या दिशेने आल्याने प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशी व स्थानिकांना बसला असून  स्वतः पोलीसच वाहतुक कोंडीत गोंधळलेले दिसले तर वाहन कुठले कुठे सोडायचे याबाबत उडालेल्या गोंधळाने व गलथान कारभार पाहायला मिळाल्याने सर्वसामान्य नागरिकांना उन्हाच्या तडाख्यात प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

वाहतूक कोंडीमुळे सोलापुरच्या दिशेला जाणारे वाहने आण्णा महाडीक पेट्रोल पंप आणि प्रयागधाम चौकातुन एक किलोमिटर पासुन वाहने विरुध्द दिशेने येऊन एलाईट चौकात पोलीसांसमोर येऊन उभे राहीले होते.

उरुळी कांचन येथे सतत होणारी वाहतुक कोंडी, आणि दिवाळी निमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले तर वाहतूक पोलिसांच्या नियोजन शुण्यतेमुळे  वडापच्या गाड्या हायवेवर  उभ्या करून प्रवाशांना बसवण्याचे व ट्रॅफिक जॅम करत होत्या विशेष म्हणजे हे सर्व वाहतूक पोलिसांच्या समोर गलथान कारभार पाहायला मिळाला तर महाडिक पंपासमोरील विरुद्ध बाजूने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाल्यामुळे महिला भगिनींना भर उन्हात थांबावे लागल्याने पाडव्याचा मुक्काम भाऊ रायाच्या घरी करण्यासाठी निघालेला ताईला भर उन्हाच्या चटक्यात थांबावे लागल्याने चिमुकल्यांचे हाल झाले.

वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह – वाहतूक पोलिसांचे काम फक्त चौकात गाड्या थांबवणे आणि गाड्या सोडणे एवढंच आहे का?, वाहतुक कोंडी होऊ नये या नियोजना कडे वाहतूक पोलिसांचे साफ दुर्लक्ष झाल्याने उरुळी कांचन येथे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत असले तरी नागरिकांनी शिस्तीचे पालन करायला हवे व नियम तोडणाऱ्यावर दंडात्मक कारवाई व्हायला हवी ती तातडीने करण्यात येणार की डोळे बंद करून हा गलथान कारभार सुरू राहणार.. असा प्रश्न निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!