बेशिस्त दुचाकी चालकांवरिल कारवाईचे नागरिकांमधून स्वागत
प्रतिनिधी नितीन करडे
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी गाड्यांच्या कर्णकर्कश हॉर्न,फटक्यासारखा आवाज काढणे, कवणा हेल्मेट,अपलवयीन मुलांनी वाहन चालवणे ,बेशिस्तपणे वेगाने वाहन चालवणे यांच्यावर कार्यवाहीचा बडगा उचलण्यात येत असून उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे निरीक्षक शंकर पाटील अँक्शन मोडवर आले असून बेशिस्त वाहन चालकांनी चांगलाच धसका घेतल्याचे पाहायला मिळाल्याने प्रवसी व नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत करत अभिनंदन केले.
उरुळी कांचन शहरात मोठ्या प्रमाणात बुलेट व इतर गाड्यांच्या सायलंन्सरच्या कर्णकर्कश आवाजात बेदरकरारपणे वेगवान वाहन चालवत फटाक्यासारख्या कानठाळ्या बसवणारा आवाज काढणारे, विनापरवाना वाहन चालवणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, वेगाची मर्यादा न पाळणे,वाकडे तिकडे स्टंट करण्याचा प्रयत्न करत वेगाने वाहन चालवत वाहतुकीच्या नियमांना पायदळी तुडवत बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांवर उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेली कारवाई नागरिकांमध्ये कौतुकाचा विषय ठरत असून पोलिसांना पाहून बेशिस्त व नियमांना पायदळी तुडवणाऱ्या वाहन चालकांची पळापळी मात्र नागरिकांमध्ये चांगलाच हास्याचा व विनोदाचा भाग ठरला.
अल्पयीन मुले व बुलेट तसेच इतर दुचाकी व चारचाकी गाड्या बेशिस्तपणे चालवत, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारे मात्र पोलिसांच्या कार्यवाहीने चांगलेच घाबरले होते.विशेष म्हणजे पोलीस निरीक्षक शंकर पाटील हे स्वतः रस्त्यावर फिरून कारवाई करत होते यामुळे स्वतः साहेब रस्त्यावर आलेले पाहून बेशिस्त वाहन चालक मात्र चांगलेच गरबडलेले पाहायला मिळाले.