Category: Uncategorized
लोणीकंद शाळेत स्वातंत्र्यदिनी गुणवंत विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा सन्मान
पुणे – स्वातंत्र्यदिनाच्या मंगलदिनी, १५ ऑगस्ट २०२५ रोजी, पी.एम.श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लोणीकंद (ता. हवेली) येथे एक भव्य कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रभातफेरी, ध्वजारोहण, संचलन, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. याचसोबत, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना गौरवण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ज्ञानप्रबोधिनी, नवोदय, आणि शिष्यवृत्ती…
मोबाईलच्या जगातून निसर्गाच्या कुशीत; वृक्षदिंडी ते वनभोजन असा पाच हजार विद्यार्थ्यांना शिक्षण, खेळ व निसर्गप्रेमाची प्रेरणा देणारा सणसवाडीचा विधायक उपक्रम
“पर्यावरण, शिक्षण आणि संस्कारांचा संगम घडवणारे प्रेरणादायी नेतृत्व म्हणजे सरपंच रुपाली दगडू दरेकर व उपसरपंच राजेंद्र दरेकर सणसवाडी (ता. शिरूर) –आजची पिढी मोबाईल आणि इंटरनेटच्या आभासी जगात गुरफटली असताना, सणसवाडी ग्रामपंचायतीने विद्यार्थ्यांना निसर्गाशी पुन्हा जोडण्याचा आगळावेगळा प्रयोग यशस्वीपणे राबवला आहे. उपसरपंच राजेंद्र दरेकर यांच्या संकल्पनेतून आणि सरपंच रुपाली दरेकर यांच्या सहकार्याने सणसवाडी व परिसरातील सात…
खेळाडूंना आणि विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना प्रोत्साहन देणार – कृषी मंत्री दत्ता भरणे
लोणीकंद (ता. हवेली) येथील न्यू टाइम स्कूलमध्ये झालेल्या सीबीएसई क्लस्टर क्रीडा स्पर्धांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि शेती हिताचे निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं.न्यू टाइम स्कूल यांच्या विविध स्तुत्य उपक्रमांचे कौतुक करत ग्रामीण भागातील दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करत असल्याबाबत भूमकर कुटुंबीयांचे कौतुक केले. खेळाडूंना…
लोकशाहीच्या लढ्यात योगदान देणाऱ्या संतू ढेरंगे यांचा महाराष्ट्र शासनाकडून सन्मान
कोरेगाव भीमाच्या मातीतील संतू आनंदा ढेरंगे म्हणजे ‘लोकशाही सैनिक’ – माजी संचालक विठ्ठल ढेरंगे कोरेगाव भिमा (ता.शिरूर) महाराष्ट्र शासनामार्फत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोरेगावभिमा येथील संतू आनंदा ढेरंगे यांना १९७५ ते १९७७ या काळात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या विरोधात लोकशाहीच्या रक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे. आणीबाणीच्या कठीण काळातही ढेरंगे यांनी लोकशाही मूल्ये,…
संशोधनात मानाचा टप्पा: नितीन मोहन शिवले यांना पीएचडी पदवी प्राप्त
पुणे: जे एस पी एम भिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च वाघोली येथे संगणक विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले नितीन मोहन शिवले यांनी निर्वाण विद्यापीठ जयपूर येथून कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग या विषयात पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. नितीन शिवले यांनी “ब्लॉक व्हॅलिडीटर हेल्थकेअर सप्लाय चेन मॅनेजमेंट युजिंग ब्लॉक चेन फ्रेमवर्क” या विषयावर…
बी. जे. एस. महाविद्यालयात “रक्षाबंधन” उत्साहात साजरा!
पुणे: रक्षाबंधनाचा पवित्र सण बी. जे. एस. महाविद्यालयात अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमात प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा आली. स्थानिकच्या अध्यक्षा रुपाली गुलालकरी आणि सचिव सहदेव चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्वच…
कोरेगाव भीमाच्या शिरपेचात मानाचा तुरा! सरपंच संदीप ढेरंगे यांना दिल्लीतील ध्वजारोहणासाठी उपस्थित राहण्याचा मान
कोरेगाव भीमा (ता.शिरूर) प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असते की, आयुष्यात एकदा तरी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर होणारा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा डोळ्यांनी पाहावा. ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या या सुवर्ण क्षणी, हा मान यंदा कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप ढेरंगे यांना मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी त्यांना सपत्नीक विशेष निमंत्रण मिळाल्याने, केवळ कोरेगाव भीमाच नव्हे, तर…
शिक्रापूरच्या भैरवनाथ वाचनालयाचा सुवर्णमहोत्सव, सरपंच आणि सदस्यांचा अनोखा उपक्रम!
शिक्रापूर (ता. शिरूर): शिक्रापूर येथील शासनमान्य भैरवनाथ मोफत वाचनालय यंदा पन्नास वर्षे पूर्ण करत आहे. या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून गावचे आदर्श सरपंच रमेश गडदे आणि ग्रामपंचायत सदस्य शालन राऊत, उद्योजक प्रीतम राऊत व इतर सदस्यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. त्यांनी स्वखर्चातून गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनालयाचे सदस्यत्व दिले आहे, ज्यामुळे वाचनसंस्कृतीला चालना…
बीजेएस महाविद्यालयात ‘जे. आयएसएएस परिषद २०२५’ चे यशस्वी आयोजन: संशोधन आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन
पुणे, २ ऑगस्ट २०२५: बीजेएस एएससी कॉलेज, वाघोली येथे आज आयएसएएस मुख्यालय आणि आयएसएएस पुणे चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिष्ठित ‘जे. आयएसएएस परिषद २०२५’ चे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. या परिषदेने संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणून वैज्ञानिक विचार आणि सहकार्याला प्रोत्साहन दिले. या परिषदेत १०० हून अधिक उपस्थिती होती, ज्यात ३५ प्रभावी पोस्टर सादरीकरणे…
शाळेतून लेकींना आणणाऱ्या बापाचा थरकाप उडवणारा अंत, पोटापासून खाली काहीच शिल्लक उरलं नाही.. बापाची आर्त हाक..माझ्या मुलींना तेवढं वाचवा..!
काळजाचा थरकाप उडवणारा ओंकारचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतात! बारामती शहर आज एका अत्यंत हृदयद्रावक घटनेने हादरले आहे. मोरगाव, कसबा आणि बारामतीला जोडणाऱ्या गजबजलेल्या महात्मा फुले चौकात झालेल्या एका भीषण अपघातात ओंकार नावाच्या व्यक्तीचा जीव गेला, पण मृत्यू समोर असतानाही त्याने आपल्या मुलींसाठी दाखवलेली तगमग आणि त्याग पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत. पोटापासून खाली काहीच…
