Category: Uncategorized
पत्रकार प्रा. डॉ. दत्तात्रय कारंडे यांचे निधन शिरूर तालुक्यात शोककळा
अल्पशा आजाराने वयाच्या ४५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर: न्हावरे (ता. शिरूर) येथील पत्रकार आणि मराठी विषयाचे प्राध्यापक डॉ. दत्तात्रय मारुती कारंडे यांचे आज पहाटे (दि. १ डिसेंबर) अल्पशा आजाराने निधन झाले. ते अवघे ४५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. डॉ. कारंडे यांनी तळेगाव…
शिक्रापूर येथे ॲनिमिया मुक्त गाव अभियान’ व आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन
शिक्रापूर, (ता.शिरूर), दिनांक: २८ नोव्हेंबर: पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती शिरूर यांच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत आरोग्य उपकेंद्र शिक्रापूर आणि ग्रामपंचायत शिक्रापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्रापूर येथे महिलांसाठी भव्य ‘ॲनिमिया मुक्त गाव अभियान’ आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. या विशेष अभियानामध्ये प्रामुख्याने…
अनिल सातव पाटील यांनी घडवले १२ हजार नागरिकांना महाकाल दर्शन
पुण्यनगरीचे श्रावणबाळ अनिल सातव पाटील यांची उल्लेखनीय जनसेवा पुणे :जनसेवेचा अखंड ध्यास घेत कार्यरत असणारे पुण्यनगरीचे श्रावणबाळ अनिल सातव पाटील यांनी आजवर तब्बल १२ हजार नागरिकांना मोफत उज्जैन महाकाल दर्शन घडवून समाजसेवेचे अनोखे उदाहरण निर्माण केले आहे. श्रद्धावान भाविकांची बाबा महाकालांच्या दर्शनाची इच्छा पूर्ण व्हावी या हेतूने त्यांनी मोठ्या प्रमाणात ही भव्य यात्रा आयोजित केली….
काशी अयोध्या मोफत दर्शन यात्रा टप्पा ३ रा संवाद मेळाव्याला भाविकांचा उदंड प्रतिसाद
लोणीकंद–पेरणे गटाचा विश्वासदर्शक कृतिशील हक्काचा माणूस म्हणून किरण सकोरेंना भरघोस आशीर्वाद पेरणे फाटा (ता. हवेली) दिनांक १८ नोव्हेंबर सर्वसामान्यांच्या दारी विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी तळमळ असणारे, समाजाशी हृदयाची नाळ जपणारे आणि सुख-दुःखात धावून येणारे नेतृत्व म्हणून पै. किरण साकोरे यांच्यावरील जनतेचा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होताना दिसत असून प्रदिप दादा कंद युवा मंच व किरण साकोरे…
जयस्तंभ अभिवादन २०२६ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून आढावा बैठकिचे आयोजन
सर्व संघटना प्रमुख, कार्यकर्ते, पत्रकार बंधु यांनी उपस्थित राहण्याचे पोलिस प्रशासनाचे आवाहन पुणे – जयस्तंभ अभिवादन २०२६ निमित्त देशभरातून अंदाजे १० ते १५ लाख अनुयायी १ जानेवारी रोजी उपस्थित राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर विविध सेवा सुविधा , सुरक्षा पूर्वतयारी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष बैठकीचे शुक्रवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता येरवडा पोलिस स्टेशन,…
स्वामींच्या कृपेने साकारला भक्ती-सेवेचा महायज्ञ’: कुसुम आबाराजे मांढरे यांच्या माध्यमातून ६५०० भाविकांना दर्शनाचा लाभ
आम्ही आलो नाही तर आम्हाला स्वामींनी कुसुम आबाराजे मांढरे यांच्या माध्यमातून बोलावले कोरेगाव भिमा (ता. शिरूर) , ७ नोव्हेंबर : भक्ती आणि सेवेचा अद्भुत संगम घडवून आणणारा एक ऐतिहासिक कार्यक्रम येथे संपन्न झाला. माजी जिल्हा परिषद सदस्या कुसुम आबाराजे मांढरे यांच्या पुढाकाराने आणि संपूर्ण समर्पणभावाने आयोजित केलेल्या या मोफत त्र्यंबकेश्वर दर्शन यात्रेत ६५०० पेक्षा अधिक…
किरण साकोरे यांच्या कार्याला पूर्ण पाठिंबा; विकास आणि सेवेची हमी आमची : प्रदिप विद्याधर कंद
प्रेमाने राम कृष्ण हरी म्हणाले अन् माऊली वाळके उपसभापती झाले, विकास कामांना व तुमच्या सगळ्यांची सेवा करायला किरण साकोरे कमी पडणार नाही ही जबाबदारी आमची – प्रदिप विद्याधर कंद पेरणे फाटा (ता. हवेली) : “विकास कामांना आणि लोकसेवेला किरण साकोरे कमी पडणार नाहीत, ही जबाबदारी आमचीच आहे,” असा ठाम विश्वास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व…
जय श्री राम नमन तुज दशरथ नंदना, पूर्ण होवो पै.किरण साकोरे यांच्या सर्व मनोकामना
अयोध्येत दर्शनावेळी यात्रेकरूंचे प्रभू श्री रामांकडे साकडे अयोध्या/पुणे:दि.१० नोव्हेंबर लोणीकंद – पेरणे जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील मायबाप जनतेसाठी प्रदिपदादा कंद युवा मंच व पै.किरण साकोरे मित्र परीवार यांच्या वतीने काढण्यात आलेल्या काशी – विश्वेश्वर व अयोध्या देवदर्शन यात्रेच्या शेवटी यात्रेकरू भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने पै.किरण साकोरे यांच्या परिवारासोबत अयोध्येत परमेश्वर प्रभू श्री रामांचे दर्शन घेतले….
राष्ट्रवादी (अजित पवार) कडून केसनंद गटात जिल्हा परिषदेला सुरेखा हरगुडे तर पं.स.ला संतोष हरगुडे यांची उमेदवारी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडून जाहीर
‘हा गट सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणार’ आमदार ज्ञानेश्वर कटके यांचा विश्वास अष्टापूर (ता.हवेली) येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने केसनंद-कोरेगाव मूळ पुणे जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषदेची उमेदवारी सुरेखा हरगुडे यांना तर पंचायत समितीची उमेदवारी संतोष पांडुरंग (एस.पी.) हरगुडे यांना जाहीर आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी जाहीर करताच टाळ्यांच्या व घोषणांच्या जल्लोषात उपस्थितांनी उत्स्फूर्त…
किरण साकोरेंच्या सेवाभावी यात्रेतून काशी विश्वेश्वराच्या दर्शनाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ
धूप, दीप आणि भक्तीचा महासंगम, वाराणसीतील गंगा आरतीचा पेरणे लोणीकंद गटातील भाविक भक्तांनि घेतला स्वर्गीय अनुभव वाराणसी, ७ नोव्हेंबर : वाराणसीच्या पवित्र घाटावर संध्याकाळचा काळोख उतरू लागला तसा गंगेच्या लहरींवर हजारो दिव्यांचा प्रकाश नाचू लागला. शंखध्वनी, घंटानाद आणि मंत्रोच्चारांच्या गजरात वातावरण पवित्रतेने भारून गेले. त्या दिव्य क्षणी लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील यात्रेकरूंनी पै. किरण साकोरे…
