Category: Uncategorized
पॉलीबॉन्ड इंडिया आणि बुधराणी हॉस्पिटलतर्फे २९५ जणांची नेत्रतपासणी
४३ जणांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया सणसवाडी (ता. शिरूर) : मागील ४६ वर्षांपासून सामाजिक बांधीलकी जपत ‘सीएसआर’ (CSR) अंतर्गत विविध उपक्रम राबविणाऱ्या पॉलीबॉन्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच भव्य नेत्रतपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिरात २९५ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून गरजू रुग्णांना पुढील उपचारांची मदत देण्यात आली आहे….
शिक्रापूर ग्रामपंचायत वाचनालयाच्या उपक्रमाचे जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांकडून कौतुक
प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता.शिरूर) ग्रामीण भागातील वाचन संस्कृती टिकवण्यासाठी शिक्रापूर ग्रामपंचायतीने राबवलेली वाचनालय चळवळ अत्यंत स्तुत्य आहे, असे गौरवौद्गार पुणे जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी काढले. शिक्रापूर येथे ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली असता, त्यांनी वाचनालयाच्या सुसज्ज ग्रंथालयातील सर्व अभिलेखांची पाहणी केली. ग्रामीण भागातही वाचनालय चळवळ उत्तम प्रकारे सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले….
रुग्णसेवेचा महायज्ञ! पै. किरण साकोरे यांच्या माध्यमातून भव्यदिव्य ‘मोफत महाआरोग्य शिबिराचे ‘ आयोजन
प्रदिपदादा कंद युवा मंच व पैलवान किरण साकोरे मित्र परिवाराच्या वतीने लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातील नागरिकांसाठी भव्य मोफत महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे भव्यदिव्य आयोजन लोणीकंद (ता. हवेली): भक्ती, सेवा, समर्पण आणि विकासाच्या बाबतीत आघाडीवर असणारे पै. किरण संपत साकोरे आता समाजसेवेच्या मैदानातही अग्रेसर ठरले आहेत. प्रदीपदादा कंद युवा मंच व किरण संपत साकोरे…
वाघोलीत वक्तृत्वाचा जागर; ‘बीजेएस’ राज्यस्तरीय स्पर्धेत सिद्धी बाफना प्रथम
वाघोली (ता.हवेली) भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात १८ वी स्व. पी. सी. नाहर स्मरणार्थ ‘मुक्तचिंतन’ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. नागपूरपासून नेवाशापर्यंतच्या २२ स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. नेवाशाच्या सिद्धी बाफना (जिजामाता कॉलेज) प्रथम क्रमांक, वसुधा पाटील (देसाई कॉलेज, पुणे) हिने द्वितीय तर नागपूरच्या अनिकेत वनारे (संताजी कॉलेज) याने तृतीय क्रमांक…
भक्ती ,सेवा, समर्पण,माणुसकी यांच्यासह विकासाचा अनोखा ‘पै.किरण साकोरे पॅटर्न’ करतोय जनतेच्या मनावर अधिराज्य
प्रदिप विद्याधर कंद यांची किरण साकोरे अचूक निवड, लाल मातीच्या पैलवानाला काळया आईच्या लेकरांच्या (शेतकऱ्यांच्या) सेवेची आवड लोणीकंद (ता. हवेली):राजकारणाच्या रणांगणात सत्तेच्या खुर्चीपेक्षा जनतेच्या हृदयात जागा मिळवणारे नेतृत्व हेच खरे लोकनेते असतात. प्रदीप विद्याधर कंदांच्या मार्गदर्शनाखाली आकाराला आलेले पै. किरण साकोरे हे असेच एक नेतृत्व आहे. लाल मातीतील कुस्तीचा कस आणि काळया आईच्या लेकरांच्या (शेतकऱ्यांच्या)…
तळेगाव ढमढेरेत बिबट्या जेरबंद; वनविभागाची तत्पर कारवाई, नागरिकांना दिलासा
प्रतिनिधी राजाराम गायकवाड तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील जगताप वस्ती व चौधरी वस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे वारंवार दर्शन होत होते. या बिबट्याने काही ठिकाणी पशुधनावर हल्ले केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर शिरूर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक मादी बिबट्या जेरबंद करण्यात यश आले असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे….
केसनंदचे शेतकरी पुत्र व उद्योजक रमेश (बाप्पु ) हरगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन
शेतकऱ्याच्या मुलाने घडविला उद्योग आणि सेवेचा अद्भुत संगम केसनंद (ता. हवेली): पूर्व हवेली तालुक्यातील केसनंद गावाचे सुपुत्र, यशस्वी उद्योजक आणि जनसामान्यांचे आधारस्तंभ रमेश उर्फ बापूसाहेब हरगुडे यांचा वाढदिवस आणि गावातील नर्मदेश्वर मंदिराचा वर्धापन दिन एकाच दिवशी साजरा होत आहे. या दुहेरी सोहळ्यामुळे केसनंद नगरीत अभूतपूर्व धार्मिक व सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा…
अपंग व्यक्तींना कायम सन्मान मिळाला पाहिजे – लुसी कुरियन
प्रतिनिधी पत्रकार राजाराम गायकवाड शिक्रापूर (प्रतिनिधी): दिव्यांग बांधवांना केवळ जागतिक अपंग दिनासारख्या एकाच दिवशी मान-सन्मान न मिळता, तो कायमस्वरूपी मिळाला पाहिजे, असे महत्त्वपूर्ण मत ‘माहेर’ संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरियन यांनी व्यक्त केले. शिक्रापूर येथील भैरवनाथ मंदिरात जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. लुसी कुरियन यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले की, समाजाने दिव्यांग व्यक्तींना…
महाराष्ट्राच्या१९ वर्षीय देवव्रत रेखेनेने २०० वर्षांत न जमलेला ‘दंड कर्म पारायण’चा विक्रम
वेदमूर्ती उपाधीने सन्मानित; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अहिल्यानगरच्या या तेजस्वी विद्यार्थ्याचे विशेष कौतुक. काशी/पुणे: संस्कृत, वेद आणि शास्त्रांच्या अभ्यासासाठी जगभरातून विद्यार्थी येत असलेल्या काशी नगरीत महाराष्ट्राच्या एका १९ वर्षीय मुलाने २०० वर्षांतील सर्वात मोठा आणि अत्यंत कठीण असलेला ‘दंड कर्म पारायण’**चा अभ्यास पूर्ण करून इतिहास रचला आहे. अवघ्या १९ वर्षांच्या या मुलाचे नाव देवव्रत महेश रेखे…
सणसवाडी ग्रामनगरीच्या सरपंचपदी शशिकला रमेश सातपुते यांची बिनविरोध निवड
गावच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘नवरा–बायको’ सरपंच होण्याचा मान सातपुते कुटुंबाच्या नावावर कोरेगाव भीमा –उद्योगनगरी सणसवाडी (ता. शिरूर) येथे सरपंच रूपाली दगडू दरेकर यांनी नियोजित वेळेत राजीनामा दिल्यानंतर नव्या सरपंचपदासाठी झालेल्या प्रक्रियेत शशिकला रमेश सातपुते यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. कोणतीही स्पर्धा नसल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया जी. डी. शेख मॅडम यांच्या…
