बारामती – गुजरात मधील बडोदा येथे नुकत्याच झालेल्या ४६ व्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा मंडळ स्पर्धेत महावितरणचे बारामती येथील उपव्यवस्थापक (वि. व ले.) दत्तात्रय ठाकूर यांना कांस्य पदक मिळाले आहे.
या स्पर्धेत देशभरातील वीज क्षेत्रातील सर्व कंपन्यांचे संघ सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत ठाकूर यांना कांस्य पदक पटकावण्यात यश मिळाले असून त्यांनी यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये महावितरणचे नाव उंचावले आहे. तर सांघिक स्पर्धेत देशातून तिसरा क्रमांक मिळवला आहे. या यशाबद्दल महावितरणचे मुख्य अभियंता अंकुश नाळे व अधीक्षक अभियंता दीपक लहामगे यांचेहस्ते ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सहा. महाव्यवस्थापक (मासं) धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे, उपकार्यकारी अभियंता कैलास जगताप व किशोर शिंदे, सहा. अभियंता धनंजय निकम व सुधीर ननवरे, मुख्य लिपीक मनोज जगताप आदी उपस्थित होते.