Category: सामाजिक
social day to day good or bad events happens everywhere.
आदर्श ग्राम’साठी डिंग्रजवाडी ग्रामस्थांनी एकजुटीने प्रयत्न करावे – गट विकास अधिकारी महेश डोके
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांकडून डिंग्रजवाडीच्या प्रगतीचे कौतुक डिंग्रजवाडी (ता. शिरूर) —डिंग्रजवाडी गाव एकीने आणि सहकार्याने प्रगती करत आहे, हा उत्साह टिकवून ठेवत ग्रामस्थांनी विकासाचे आदर्श ग्राम होण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन शिरूरचे गट विकास अधिकारी महेश डोके यांनी केले. शासनाच्या स्पर्धांमध्ये विजयी होणे हे केवळ निमित्त आहे, मात्र गावचा सर्वांगीण विकास…
सणसवाडीकरांकडून माजी आमदार अशोक पवार यांना दिवाळीच्या शुभेच्छा
वडगाव रासाई येथे स्नेहपूर्ण भेट; ग्रामस्थांनी जपला आत्मीयतेचा बंध, माजी आमदार दाम्पत्यासोबत सरजा करून पाडवा जपला नात्यातील निरपेक्ष गोडवा कोरेगाव भीमा (ता. शिरूर) —जनसेवा आणि विकास यांच्या संगमातून शिरूर-हवेली मतदारसंघाला उजळवणारे माजी आमदार ॲड. अशोक पवार यांना सणसवाडी ग्रामस्थांनी दिवाळी पाडव्यानिमित्त स्नेहपूर्ण शुभेच्छा दिल्या. वडगाव रासाई येथील त्यांच्या निवासस्थानी ग्रामस्थांनी भेट देत आमदार दांपत्याशी आत्मीय…
कर्तव्याला कृतज्ञतेची जोड! कुसुम आबाराजे मांढरे यांच्या हस्ते सणसवाडी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
सणसवाडी (ता. शिरूर): गावाच्या सेवेत अहोरात्र राबणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत, माजी जिल्हा परिषद सदस्या कुसुम आबाराजे मांढरे यांनी सणसवाडी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड केली. त्यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळ आणि भेटवस्तू देऊन त्यांच्या निष्ठावान कार्याचा सन्मान केला. गाव जागण्यापूर्वी आणि झोपल्यानंतरही सेवा देणारे ‘कर्मचारीच खरे बळ’ – ग्रामस्थांच्या सेवेत असणारे कर्मचारी हे गावचे निष्ठावान…
इतिहासाचे जतन, संस्कृतीचे संवर्धन, ‘किल्ले बनवा’ स्पर्धेतून सरपंच संदीप ढेरंगे घडवत आहेत शिवसंस्कारांचे रोपण
“गड किल्ल्यांचे करूया संवर्धन, इतिहासाचे करूया जतन स्पर्धेचे आयोजन कोरेगाव भीमा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचे जतन आणि नव्या पिढीमध्ये देशभक्तीचा भाव रुजवण्यासाठी संदीपदादा ढेरंगे फाउंडेशनने ‘किल्ले बनवा स्पर्धा – पर्व २’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. ही केवळ स्पर्धा नसून इतिहास, संस्कृती आणि सर्जनशीलतेचा उत्सव आहे. २० ते २३ ऑक्टोबर २०२५ या…
शिक्रापूर ग्रामपंचायतिचे आदर्श सरपंच रमेश गडदे व सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिव्यांग व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!
मागण्याऐवजी देण्याचा’ अनोखा आदर्श! शिक्रापूरच्या दिव्यांग बांधवांनी ग्रामपंचायतीसाठी दिली ‘लिफ्ट’ची अनोखी भेट प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता. शिरूर): पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर गावाने सामाजिक औदार्याचा एक नवा आणि प्रेरणादायी अध्याय लिहिला आहे. इतरांकडून सोयीसुविधांची मागणी करण्याऐवजी, येथील दिव्यांग बांधवांनी एकत्र येत स्वतःच्या हक्काच्या निधीतून ग्रामपंचायत इमारतीसाठी ‘लिफ्ट’ बसवण्याची घोषणा करून सर्वांना चकित केले आहे. ‘मागणे’ नाही,…
बी.जे.एस. महाविद्यालयात बॉक्सिंगचा ‘पंच’: वाघोलीच्या ‘हर्ष’ आणि ‘सलोनी’चा सुवर्णविक्रम!
वाघोली (ता.शिरूर) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आयोजित आंतरविभागीय बॉक्सिंग (मुले व मुली) स्पर्धा भारतीय जैन संघटनेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात (बी.जे.एस.) दि. १० व ११ ऑक्टोबर २०२५दरम्यान अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाल्या. पुणे शहर, जिल्हा, आहिल्यानगर आणि नाशिक विभागांतील एकूण १४० (८० मुले व ६० मुली) खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेऊन आपली जिद्द आणि…
पुणे जिल्ह्यासाठी कोरेगाव भीमा ‘पथदर्शी’! कचरा प्रकल्पापासून डिजिटल सेवेपर्यंत ‘आदर्श ग्राम’ ठरेल – सीईओ गजानन पाटील
सरपंच संदीप ढेरंगे यांची सर्वांगीण विकासदृष्टी; अशक्य ते शक्य करुन दाखवत वनखात्याची जमीन मिळवली! कोरेगाव भीमा (ता. शिरूर) : मेहनत, दूरदृष्टी आणि दृढ इच्छाशक्ती असल्यास गावाचा सर्वांगीण विकास साधता येतो, हे कोरेगाव भीमा येथील ग्रामपंचायतीने सिद्ध केले आहे. येथील उत्कृष्ट कचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि डिजिटल सेवा प्रणाली संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी मार्गदर्शक व पथदर्शी ठरेल, असे…
मनस्वी पांढरेला विभागीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक
नरेश्वर तालीमीतील मल्ल राज्य स्तरासाठी सज्ज कोरेगाव भीमा (ता.शिरूर) महाराष्ट्राच्या महिला कुस्तीला नवी आशा व प्रेरणा ठरत आहे कोरेगाव भीमा येथील नरेश्वर तालीम याचे कारण म्हणजे मनस्वी पांढरे विभागीय स्तरावर सुवर्णपदकासह राज्य स्पर्धेसाठी पात्र जिद्द, मेहनत आणि गुरुजनांवर विश्वास ठेवल्यास कोणतेही ध्येय अशक्य नसते, हेच मनस्वी सोमा पांढरे या नवोदित मल्ल कन्येने सिद्ध केले आहे….
कोरेगाव भिमा येथे “स्वच्छता, आरोग्य, विकास या त्रिसूत्रीसह सीईओ गजानन पाटील यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ
डिजिटल युगातील पंचायतराजाचा आदर्श बनणार कोरेगाव भीमा ग्राम पंचायत कोरेगाव भिमा, (ता. शिरूर), दि. ९ ऑक्टोबर:‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गजानन पाटील उद्या, शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी कोरेगाव भिमा ग्रामपंचायतला भेट देणार आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी या महत्त्वपूर्ण दौऱ्यासाठी ग्रामपंचायतीने अनेक लोककल्याणकारी व विकासकामांचे आयोजन केले…
सणसवाडी येथे खेळ रंगला पैठणीचा माजी आमदार अशोक पवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण मोठा उत्साहात संपन्न
दुर्गामाता उत्सवाला सामाजिक उपक्रमांची जोड देत गरजवंत महिलांना साड्यांचे वाटप सणसवाडी (ता. शिरूर): सणसवाडी येथील मयूर नगर दुर्गामाता नवरात्र उत्सव मंडळाने यंदाचा उत्सव धार्मिकतेसोबतच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून साजरा केला. माजी आमदार अशोक पवार यांच्या हस्ते खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमातील विजेत्या महिलांना बक्षिसांचे वितरण तर गरजवंत महिलांना साड्यांचे वाटप मोठ्या उत्साहात करून मंडळाने समाजासमोर एक…
