शिरूर विधानसभेत शिक्रापूर सणसवाडी जिल्हापरिषद गट ठरला गेम चेंजर

स्वराज्य टाईम्स न्यूज

बाजार समितीचे माजी संचालक धैर्यशील उर्फ आबा मांढरे, माजी जिल्हा परिषद कुसुम मांढरे यांच्या प्रयत्नांना यश

राज्यासह पुणे जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेली १९८ शिरूर विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांच्या नेत्रदीपक विजयात मोलाची साथ देत माजी संचालक धैर्यशील उर्फ आबा मांढरे व माजी जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे जायंट किलर ठरले असून त्यांनी व माजी सभापती मोनिका हरगुडे यांच्यासह महायुतीच्या अनेक नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मोलाचे योगदान आहे.

मागील २०१९ च्या निवडणुकीत आमदार ॲड अशोक पवार यांना ३,६७१ मतांची आघाडी देत प्रचारात व निवडणुकीत मोठी भूमिका पार पाडली होती पण यावेळी ज्ञानेश्वर कटके यांना शिक्रापूर परिसरात २७४६ इतके मताधिक्य दिले.मध्यंतरीच्या काळात काही राजकीय घडामोडी घडल्याने माजी संचालक धैर्यशील उर्फ आबा मांढरे व माजी जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे जायंट किलर ठरले असून त्यांनी व माजी सभापती मोनिका हरगुडे यांच्यासह अनेक जण आमदार अशोक पवार यांच्यापासून दुरावले त्यात राष्ट्रवादीचे विभाजन झाल्याने त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करत नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या विजयात मोलाची कामगिरी केली.

आबा मांढरे यांचा दांडगा जनसंपर्क – शिक्रापूर येथील माजी संचालक आबा मांढरे व त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांचा मोठा जनसंपर्क असून महिला भगिनी व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांचा धडाका यामुळे कुसुम मांढरे यांचा जनसंपर्क प्रभावी ठरला तर आबा मांढरे यांचा असणारा मित्र परिवार ,दांडगा जनसंपर्क व अबाल वृढांशी असणारी जवळीक मात्र यावेळी त्यांना चांगलीच कामी आली असून नाते कोरेगाव भिमा, वढू बुद्रुक, पिंपळे जगताप, सणसवाडी,तळेगाव ढमढेरे, कोंढापुरी,हवेलीत अनेक गावे,शिरूरच्या पूर्व पट्ट्यातील अनेक गावे येथील नागरिक, पै पाहुणे, मित्रमंडळी यांच्याशी संवाद साधत मतदान मिळवण्यासाठी मोठे कष्ट घेत अनमोल योगदान देत आमदार अशोक पवार यांच्या परभवासाठी जंग जंग पछाडले.

या विजयाला अनेक ज्ञात अज्ञात कार्यकर्ते व नेत्यांचे सहकार्य राहिले असून हा विजय शिरूर हवेलीतील अनेक जणांचा असल्याचा मानण्यात येत आहे.

शिरूर हवेली तालुक्यातील खूनशीचे व जिरवाजिरवीचे राजकारण हद्दपार करण्यासाठी व प्रशासनाने दबावाविरहित जनसेवा करावी,सर्वसामान्य जनतेचे सर्वांगीण कल्याण व्हावे व तालुक्यातील सहकार जगावे ,तालुक्यातील राजकीय दहशत संपवण्यासाठी सर्वांनी एकत्र येत हे यश मिळवले असून पद आल्यावर माणसाने कसे वागू नये अन्यथा तालुका कसा धडा शिकवतो हे या विजयावरून तालुक्याच्या इतिहासात लक्षात राहील. – धैर्यशील उर्फ आबा मांढरे,माजी संचालक बाजार समिती शिरूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!