शिरूर तालुक्यात सरपंच आरक्षण सोडत: कही खुशी, कही गम!

Swarajyatimesnews

दिनांक ११ ११ जुलै २०२५: शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाची आरक्षण सोडत मुख्य तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात उत्साहात पार पडली. या सोडतीमुळे अनेक गावांमध्ये खुले पद मिळाल्याने जल्लोषाचे वातावरण होते, तर काही गावांमध्ये आरक्षणामुळे इच्छुकांचा हिरमोड झाल्याचे चित्र दिसले. त्यामुळे “कही खुशी, कही गम” अशा मिश्र भावना या सोडतीत उमटल्या.

पारदर्शकतेने पार पडली सोडत – तहसिलदार बाळासाहेब म्हस्के, नायब तहसिलदार प्रकाश मुसळे, गटविस्तार अधिकारी आर. आर. राठोड, आणि निवासी नायब तहसिलदार स्नेहा गिरीगोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. विशेष म्हणजे, शालेय विद्यार्थिनी समिक्षा गिरमकर हिच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण निश्चित करण्यात आले, ज्यामुळे पारदर्शकतेवर भर देण्यात आला.

प्रमुख गावांमध्ये खुल्या वर्गासाठी आरक्षण – यंदा खुल्या वर्गासाठी आरक्षित झालेल्या काही प्रमुख आणि मोठ्या गावांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: शिरूर ग्रामीण, सणसवाडी, रांजणगाव गणपती, तळेगाव ढमढेरे, सरदवाडी, टाकळी हाजी, मलठण, भांबर्डे, सविंदणे, बाभुळसर खुर्द, चिंचणी, काठापूर खुर्द, वडनेर खुर्द, शिरसगाव काटा, चांडोह, करंदी, रांजणगाव सांडस, तांदळी, कर्डेलवाडी, मांडवगण फराटा, सोनेसांगवी, दहिवडी, इनामगाव, खैरेवाडी, जातेगाव खुर्द आदी. या गावांमध्ये स्थानिक नेते, इच्छुक उमेदवार आणि ग्रामस्थांनी आता यशस्वी मोहीम राबवण्याची तयारी सुरू केली आहे.

महिलांना सरपंचपदाची संधी – सरपंचपदावर महिलांना संधी देण्यासाठी अनेक गावांत पदे आरक्षित करण्यात आली आहेत. यामध्ये शिक्रापूर, पिंपरखेड, उरळगाव, चिंचोली मोराची, गणेगाव दुमाला, धानोरे, पाबळ, निमोणे, कोंढापुरी, गुनाट, दरेकरवाडी, मोटेवाडी, कोरेगाव भीमा, आपटी, कळवंतवाडी, आंबळे, विठ्ठलवाडी, निर्वी या प्रमुख गावांचा समावेश आहे.

  • प्रवर्गनिहाय आरक्षण सूची –
  • आरक्षण सोडतीनुसार विविध प्रवर्गांसाठी आरक्षित झालेली गावे:
  • अनुसूचित जाती (SC): हिवरे, आमदाबाद, गोलेगाव, वाजेवाडीअनुसूचित जाती महिला (SC-महिला): निमगाव म्हाळुंगी, जांबुत, मुखई, वढू बुद्रुक
  • अनुसूचित जमाती (ST): कुरूळी
  • अनुसूचित जमाती महिला (ST-महिला): माळवाडी, वडगाव रासाई.
  • इतर मागास वर्ग (OBC): कासारी, शरदवाडी, अण्णापूर, कारेगाव, कोळगाव डोळस, मिडगुलवाडी, वाघाळे, पारोडी, खंडाळे, फाकटे, कवठे येमाई, आंधळगाव, कान्हूर मेसाई.
  • इतर मागास वर्ग महिला (OBC-महिला): चव्हाणवाडी, करडे, म्हसे बु, पिंपरी दुमाला, वाडा पुनर्वसन, सादलगाव, पिंपळे जगताप, निमगाव भोगी, पिंपळसुटी, आलेगाव पागा, नागरगाव, बाभुळसर बु, रावडेवाडी

पुढील राजकीय रणधुमाळीची तयारी – आरक्षण निश्चित होताच इच्छुक उमेदवार, समर्थक आणि राजकीय गटांनी निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः खुल्या गटांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे, तर काही आरक्षित गटांत नवे चेहरे उदयास येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच, आरक्षण सोडतीनंतर शिरूर तालुक्यात सरपंच निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार असून, गावोगावी नव्या राजकीय समीकरणांचा खेळ रंगण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

“आरक्षण सोडत पूर्णपणे पारदर्शकपणे आणि नियमबद्ध पद्धतीने पार पडली आहे. ग्रामपंचायतीतील नेतृत्व आता विविध सामाजिक घटकांना मिळणार असून महिलांना मोठ्या प्रमाणात संधी मिळाली आहे.” – शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!