ज्ञानेश्वर कटके यांच्यावर दिर्घायुष्यासह भावी आमदार होण्याच्या शुभेच्छांचा वर्षाव

स्वराज्य टाईम्स न्यूज

 शिरूर-हवेलीमध्ये लोकप्रियतेला उधाण, सुसंस्कृत नेत्याच्या वाढदिवसानिमित्त हजारो नागरिक, कार्यकर्ते, विविध पदाधिकारी यांची लक्षणीय उपस्थिती 

 वाघोली (ता.हवेली) शिवसेना (उबाठा) पुणे जिल्हा प्रमुख तथा जि.प. सदस्य ज्ञानेश्वर (आबा) कटके यांच्या वाढदिवसानिमित्त वाघोलीत मोठ्या जल्लोषात कार्यक्रम पार पडला. कटके यांना शुभेच्छा देण्यासाठी शिरूर-हवेलीतील नागरिकांसह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि मान्यवरांनी उपस्थितीत लावत दीर्घायुष्यासह भावी आमदार म्हणून शुभेच्छांचा वर्षाव केला.

जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नेतृत्व ज्ञानेश्वर कटके  –  ज्ञानेश्वर कटके यांनी सर्वसामान्य माणसांच्या मनात आगळेवेगळे स्थान निर्माण तर केले असून या वाढदिवसानिमित्त हजारोंच्या संख्येने अबालवृध्द, माताभगिनी यांची लक्षणीय उपस्थिती होती तर मतदारांच्या मनात अढळ स्थान व आपुलकी निर्माण केल्याने कटके यांच्यावर अफाट प्रेम करणाऱ्या जनसमुदायाच्या उपस्थिती पुन्हा एकदा दिसून आली. ‘ऐंशी टक्के समाजकारण, वीस टक्के राजकारण’ या  ध्येयाने सर्वसामान्यांच्या मनात अढळस्थान निर्माण केले आहे.  विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असली तरी ज्ञानेश्वर कटके यांनी माणुसकी जपणारे विकासाचे राजकारण करत एक आगळा वेगळा ठसा उमटवला आहे.

तू मान या ना मान लेकीन ये पब्लिक है, सब जाणती है’ –  निवडणुकीच्या तोंडावर इच्छुकांची धाकधूक वाढवणारा व अफाट जनसमुदायाच्या रेकोर्डब्रेक उपस्थितीने कटके यांची लोकप्रियता दिसून आली. मतदार राजाच्या मनात स्थान मिळवण्यासाठी काही इच्छुकांनी होर्डिंग्ज आणि जाहिरातबाजी सुरू केली असली, तरीही कटके यांच्या साधेपणाने व केलेल्या विकासाच्या कामांनी, माणुसकीच्या व आपुलकीच्या संवादाने मतदारांचे लक्ष वेधले असून इतर इच्छुकांच्या मनात धडकी भरवणारी असून 

बॅनर बाजी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी हपापलेले व सर्वसामान्य जनतेशी नाळ तुटलेल्या इच्छुकांबाबत ‘ये पब्लिक है, सब जाणती है’ या वाक्याचा प्रत्यय येत आहे. 

भाजपच्या पदाधिकाऱ्याने आणलेल्या भावी आमदार या केक ने वेधले लक्ष – ज्ञानेश्वर कटके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका भाजप पदाधिकाऱ्याने ‘भावी आमदार माऊली आबा कटके’ असे लिहिलेला केक कटके यांच्या वाढदिवसानिमित्त आणला या केकने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले असून पक्षाच्या चौकटीबाहेर माणुसकीचे व जिव्हाळ्याचे संबंध जपणारे नेतृत्व म्हणजे ज्ञानेश्वर कटके असल्याचे दिसून आले असून यामुळे कटके यांच्या माणुसकीची,जिव्हाळ्याची व पक्षविरहित व निस्वार्थ राजकारणाची प्रचिती दिसून आली.  झाली आहे.

माझा भोळा शंकर आमच्या माऊलीला पावणार तोच आमदार व्हणार – ज्ञानेश्वर कटके यांनी हजारोंच्या संख्येने सर्वसामान्य नागरिकांना काशी तीर्थक्षेत्र दर्शन घडवले व मुलासारखी सर्वांची काळजी घेतल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आधुनिक श्रावण बाळ म्हणून प्रतिमा तयार झाली असून यावेळी मात्र उज्जैन येथील महाकालेश्र्वर दर्शनासाठी हजारो भाविकांना घेऊन जात असून यातील एक आजी बाईंनी “माझा भोळा शंकर आमच्या माऊलीला पावणार तोच आमदार व्हणार”,अशा शुभेच्छा देत भोळ्या शंभू महादेवाला साकडे घालत आमदार होण्याच्या हृदयापासून दिलेल्या शुभेच्छा मात्र कटके यांची लोकप्रियता व सर्वसामान्य नागरिकांशी जोडलेल्या नाळीची व माणुसकीच्या घट्ट नात्याची प्रचिती देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!