शिक्रापूर, (ता. शिरूर): पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिक्रापूर येथील १९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून, राज्य गुणवत्ता यादीत सुयश उगले याने थेट ९ वा क्रमांक पटकावत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. या यशामुळे शाळेच्या शिष्यवृत्ती यशपरंपरेला अधिक बळ मिळाले आहे.
शाळेचे एकूण २० विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेच्या गुणवत्तेची चमक अधोरेखित करत आहेत. विशेष म्हणजे, विद्यार्थी सोहम जुनघरे याची नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झाली आहे, हीदेखील शाळेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
सुयश उगले,आशुकुमार कटियार,यश पवार,हर्षवर्धन कर्हे,आईशा आलमेल,प्रद्युम्न धुप्पे,सोहम जुनघरे,अक्षदा गायकवाड,रुद्र वीर राठोड,सेजल लवांडे,आर्य शिंदे,राज पवार,श्रेयस अडसूळ,निशा कांबळे,शहाबाज तांबोळी,कृष्णा जाधव,संस्कृती पांढरे,तनुष्का पाटील,ज्ञानेश्वरी जगताप विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन करणारे शिक्षक म्हणजे मधुमालिनी गोडसे, रजनी भिवरे, सुशीला तांबे, संजया मांडगे, मंगेश येवले आणि सारिका गुंजाळ यांनी मेहनतपूर्वक अभ्यासक्रम समजावून दिला. त्यांचे या यशात मोलाचे योगदान आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सनी जाधव, उपाध्यक्ष चंद्रकांत मांढरे आणि सर्व सदस्यांनी केले. तसेच शिक्रापूर ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश गडदे, उपसरपंच वंदना भुजबळ, माजी उपसरपंच सुभाष खैरे, शिक्षणतज्ज्ञ नवनाथ सासवडे, मुख्याध्यापक साधना शिंदे, केंद्रप्रमुख प्रकाश लंघे, विस्तार अधिकारी वंदना शिंदे व मुकुंद देंडगे, तसेच गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर आणि शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनीही अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.