शिक्रापूर येथे गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

Swarajyatimesnews

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आधार फाउंडेशन तर्फे गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षकांना ट्रॉफी, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

   या कार्यक्रमाला विस्तार अधिकारी राजेंद्र टिळेकर , आधार फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष  खैरे, केंद्रप्रमुख अनिल पलांडे, केंद्रप्रमुख लंघे, शाळेच्या मुख्याध्यापिका साधना शिंदे, आधार फाउंडेशनच्या उपाध्यक्षा पल्लवी हिरवे, तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष गणेश गायकवाड, सदस्य पत्रकार निलेश जगताप, राहुल येवले, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष चंद्रकांत मांढरे, सदस्य सचिन भोसले, सतीश तायडे, राजेंद्र पाखरे, मुखई आश्रम शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुरेश चव्हाण, सिंधुताई जाधव, असिफ तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शुष्क मधुमालिनी गोडसे,  रजनी भिवरे,  सुशीला तांबे,  सारिका गुंजाळ, शिक्षक संजय मांडगे,  मंगेश येवले यांना तर नवोदयसाठी निवड झालेले विद्यार्थी सोहम जुनघरे, राज्य गुणवत्ता धारक विद्यार्थी सुयश उगले, जिल्हा गुणवत्ता धारक विद्यार्थी आशु कुमार कटियार, यश पवार, हर्षवर्धन कर्हे, आईशा आलमेल, प्रद्युम धुप्पे, अक्षदा गायकवाड, रुद्र वीर राठोड, सजेल लवांडे, आर्य शिंदे, राज पवार, श्रेयस अडसूळ, निशा कांबळे, शाहबाज तांबोळी, कृष्णा जाधव, संस्कृती पांढरे, तनुष्का पाटील, ज्ञानेश्वरी जगताप, मल्हार हिरमुखे यांना सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी आधार फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष खैरे यांनी फाउंडेशनच्या उपक्रमांची माहिती दिली व विद्यार्थ्यांना यशस्वी भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात विस्तार अधिकारी राजेंद्र टिळेकर यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टाकळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पडवळ यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!