शिक्रापूर (ता.शिरूर) येथे विजय स्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येनं भीम अनुयायी आले होते यावेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत, कर्तव्यावर असताना माणुसकी जपत आलेल्या भीम अनुयायांच्या चहा ,नाष्टा व भोजनाची उत्तम सुविधा करत कर्तव्य व माणुसकी एकच वेळी जपल्याने संबंधित अधिकाऱ्यांचे अनुयायांनी आभार मानले.
कोरेगाव भीमा विजय स्तंभ अभिवादन सोहळ्याच्या निमित्ताने राज्यातील लाखोंच्या संख्येने आलेल्या भीम अनुयायांना ग्राम प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कर्तव्य बजावत असताना माणुसकी जपत पाच हजार अनुयायांना चहा ,नाष्टा व उत्तम दर्जाचा चविष्ट पुलाव भोजन देत माणुसकी जपत सामाजिक कार्यात आपले योगदान दिले.रात्री आठ वाजेपर्यंत अनुयायांना गरमागरम चहा देण्यात आल्याने महिला भगिनी, वृध्द, नागरिकांनी आनंद व्यक्त करत आभार मानले.
सदर चहा, नाष्टा व पुलाव भोजन पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी संजय शिंदे, ग्राम पंचायत अधिकारी शिवाजी शिंदे, शांताराम पाडळे, निलेश लोंढे,स्वाती सोनवणे, मीना उबाळे, पि सी केदारे भाऊसाहेब , विशाल ढसाळ, रतन दवणे, बी पि गायकवाड, गणेश ओव्हाळ इत्यादी दानशुरांनी अनुआयायांना चहा नाश्ता व पुलाव यांच्या नाश्त्याची व भोजन सेवा दिली