मानेवर वर्मी घाव, घटना स्थळी व परिसरात शिक्रापूर पोलिसांचा बंदोबस्त
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांच्यावर अंदाजे ३५ वर्षीय इसमाने धारदार शास्त्राने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून यामुळे शिक्रापूर परिसरात खळबळ उडाली आहे.(A shocking incident has taken place in which a 35-year-old man attacked former Deputy Sarpanch Dattatray Gilbile of Shikrapur (Shirur taluka) with a sharp weapon and seriously injured him, resulting in his death. This has created a stir in the Shikrapur area.)
हा प्राणघातक हल्ला शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांच्यावर झाला असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हल्ल्या मागील कारण अद्याप अस्पष्ट असून प्राथमिक दृष्ट्या जमिनीच्या वादावरून खून झाल्याची माहिती मिळत आहे. या हल्यात त्यांच्या मानेवर वर्मी घाव बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिक्रापूर येथील माजी उपसरपंच यांच्या घराजवळच एका अंदाजे ३५ वर्षाच्या इसमाने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे.
गंभीर जखमी झालेले माजी उपसरपंच यांना पुणे येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून या घटनेची गंभीर दखल घेत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी या परिसरात बंदोबस्त लावला असून , परिस्थिती नियंत्रणात आणली आहे तर आरोपीच्या शोधासाठी पथके पाठवले आहे.
याबाबत माहिती मिळताच तातडीने शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी तातडीने पोलीस बंदोबस्त पाठवत ,परिस्थिती नियंत्रणात आणली असून घटनेचा तपास सुरू केला आहे.
टिप – बातमी अपडेट होत आहे.