राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादीच्या अनेक आमदार कार्यकर्त्यांनी शरद पवारांची साथ सोडली. त्यामुळे साथ सोडून गेलेल्याल्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी शरद पवारांनी मैदानात उतरून जाहीर सभा घेतल्या. अशातच हडपसर मतदारसंघातील विद्यमान आमदार चेतन तुपे यांनीही पवारांची साथ सोडली. त्यानंतर शरद पवार गटाने शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिली. जगताप यांच्यासाठी पवारांनी आता एक मोठे ट्विट केले आहे.

https://x.com/PawarSpeaks/status/1858415138132685286
प्रशांतत जगताप यांनी अडचणीच्या वेळी पक्ष निष्ठा सोडली नाही. चेतन तुपे यांनी मात्र फुटीरांना साथ दिली. वडिल विठ्ठल तुपे यांच्याकडून निष्ठा काय असते हे त्यांनी शिकायला हवे होते. असे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यावर ज्या दैवतासाठी तळहातावर प्राण घेऊन लढतोय. त्या दैवताकडून कौतूक होणं याहून मोठं भाग्य काय ? साहेब प्रयत्नांची पराकाष्ठा करू. गद्दरांना त्यांची जागा दाखवू असा इशाराच जगताप यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, प्रशांत जगताप यांच्यासाठी स्वत: शरद पवार यांनी हडपसरमध्ये जाहीर सभा घेतल्या आहेत. जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी देखील मतदारसंघात सभा घेतल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघात कोणता निकाल लागणार ? त्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.