शिरूरमधील सभेत शरद पवार यांनी केली अजित पवारांची नक्कल

स्वराज्य टाईम्स न्यूज

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नक्कल केली होती. आता पुन्हा एकदा शिरूरमधील सभेत शरद पवार यांनी अजितदादांनी नक्कल केली आहे.यानंतर एकच उपस्थितीतांमध्ये एकच हशा पिकला आहे.

याला कारण ठरलं अजितदादांनी लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे आणि अशोक पवार यांना भरलेला दम.अजितदादांनी अशोक पवार यांच्या ताब्यात असलेल्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावरून टीका केली होती. तसेच, लोकसभा निवडणुकीवेळी शिरूरमध्ये जाऊन ‘कसा निवडून येतो बघतोच,’ असं म्हणत अमोल कोल्हे यांना दम भरला होता.

याचीच नक्कल करत शरद पवार यांनी अजितदादांची खिल्ली उडवली आहे.शिरूरमधील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना म्हणाले, “शिरूरमधील सगळ्या कामांची जबाबादारी अशोक पवार यांच्या खांद्यावर दिली आहे. शिरूरमधील जनतेनं आणि अशोक पवारांनी ज्या पद्धतीनं काम केलं आहे, त्यामुळे आम्हाला तालुक्याची चिंता नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!