गावचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास – नवनिर्वाचित सरपंच प्रसाद गव्हाणे
डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथे एकमताने आणि शांततेत पार पडलेल्या निवडणुकीत प्रसाद शांताराम गव्हाणे यांची ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. माजी सरपंच प्रकाश गव्हाणे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. सरपंचपदासाठी प्रसाद गव्हाणे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने, त्यांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली.
या निवडणूक प्रक्रियेदरम्यान गावातील सर्व प्रमुख मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी सरपंच प्रकाश गव्हाणे यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य सागर गव्हाणे, दिपाली गव्हाणे, शोभा गव्हाणे, प्रिया गव्हाणे यांनी नवनिर्वाचित सरपंचांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी संभाजी गव्हाणे, शहाजी गव्हाणे, बाप्पूसाहेब गव्हाणे, मधुकर गव्हाणे, तुषार गव्हाणे, दत्तात्रय गव्हाणे, बालाजी गव्हाणे, भालचंद्र गव्हाणे, रघुनाथ गव्हाणे, तुकाराम गव्हाणे, वैभव गव्हाणे, सुरेश गव्हाणे आदींनीही उपस्थित राहून प्रसाद गव्हाणे यांच्या निवडीचे अभिनंदन केले.
निवडणूक निर्णय अधिकारी कोरेगाव मंडल अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कामकाज सुरळीत पार पडले. त्यांना ग्रामसेवक रमेश जासुद आणि मदतनीस मोहन भुजबळ, निशा गव्हाणे, अशोक गव्हाणे, संतोष गव्हाणे यांचे सहकार्य लाभले.
प्रगतशील शेतकरी असलेले प्रसाद गव्हाणे यांनी शेतीसोबतच दुग्धव्यवसायातही यश मिळवले आहे. त्यांच्याकडे असलेल्या व्यावहारिक आणि सामाजिक जाणीवेमुळेच त्यांनी समाजसेवा आणि गावचा सर्वांगीण विकास हेच ध्येय जपले आहे.