२९ विद्यार्थी चमकले
सणसवाडी (ता.शिरूर) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने नुकत्याच जाहीर झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वसेवाडी (सणसवाडी) ने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम राखत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण २९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
इयत्ता आठवीचा देदीप्यमान निकाल – इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी विशेषतः लक्षवेधी कामगिरी केली आहे. झरीन नासिर सय्यद आणि ईश्वरी अमोल दरेकर यांनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे, ही शाळेसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. याव्यतिरिक्त, धनश्री बारापात्रे (२६४), हिमांशी पाटील (२५८), पूर्वा नायकल (२५६), समृद्धी मातोळे (२५६), शुभनित डांगे (२५६), शंतनू मेटे (२५०), रागिणी तिडके (२४६), श्रवण पऱ्हाड (२४४), पौर्णिमा गुंड (२४२), समर्थ काळे (२४०), प्रिया गच्चे (२३८), पायल कदम (२३४), विद्या कोंडाळ (२३२), तनुश्री परळकर (२२२), माधुरी खंडारे (२२०), गौरी कागणे (२१८), रितेश टाळके (२१४), वेदांती पालवे (२१०), प्रतिक्षा बरसाले (२०८), दीपक कश्यप (२४२), स्वस्तिका सोनार (२१४) यांनीही यश मिळवले आहे.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संतोष गोसावी, शिक्षक महिराज इनामदार आणि दिक्षा गुंदेचा यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश – इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनीही जिल्हा गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केले आहे. यामध्ये प्रीती कदम (२७४), श्रद्धा गर्जे (२७२), प्रांजल अंकुशे (२७२), मयूर खडके (२७०), तृप्ती चोपडे (२६२), तनु गायकवाड (२५८), लता यादव (२५२), स्वरूप बडे (२५२), अश्रवी हरगुडे (२४८), आदित्य आंधळे (२४८), आराध्या गजभारे (२४८), भार्गव मोतीवाले (२४८), ओंकार पवळ (२४६), अर्श खुटाणबुजे (२४४) यांचा समावेश आहे.
या विद्यार्थ्यांना शिक्षक भाऊसाहेब उचाळे, मंगल उचाळे, सुजाता भुजबळ आणि सुरेखा घोडे यांनी यशस्वी मार्गदर्शन केले. कार्यक्रम प्रसंगी माजी सभापती मोनिका हरगुडे, सरपंच रुपाली दरेकर, उपसरपंच राजेंद्र दरेकर, माजी सरपंच अजित दरेकर, माजी उपसरपंच नवनाथ हरगुडे, व्हाईस चेअरमन हनुमंत हरगुडे, दगडू दरेकर, रामदास दरेकर, अध्यक्ष अमोल हरगुडे, समिती सदस्य महेंद्र दरेकर, अंबादास गर्कल आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष गोसावी यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन भाऊसाहेब उचाळे यांनी केले. या यशाबद्दल सर्व विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचे परिसरातून कौतुक होत आहे.