सणसवाडी (ता.शिरूर) फक्कडराव बाबुराव दरेकर ( वय ९७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले असून त्यांचे सणसवाडी पंचक्रोशितील धार्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात महत्वाचे योगदान होते. त्यांच्या निधनाने विविध क्षेत्रात मोठी हानी झाली आहे. वारकरी विचारांचे शांतसंयमी व इतरांना मदत करणारे अशी त्यांची सामाजिक ओळख होती.
योग्य आहार, सद्विचार, शांत निर्मळ स्वभाव व इतरांना नेहमी मदतीचा हात यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभले असून त्यांच्या विचारांचा व संस्कारांचा वारसा पुढे चालवणे हीच त्यांना श्रद्धांजली क्षणोक्षणी अरोन करणार असल्याची भावना सरपंच रुपाली दगडू दरेकर यांनी व्यक्त केली.
सणसवाडी ग्राम नगरीच्या माजी सरपंच आशा सोमनाथ दरेकर यांचे सासरे तर विद्यमान सरपंच रुपाली दगडू दरेकर यांचे आजे सासरे होते.त्यांच्या पश्चात मुलगा हनुमंत दरेकर, रामदास दरेकर, मुलगी अंजना साहेबराव साकोरे, भाऊ सोपान दरेकर, रावसाहेब दरेकर, बहिण श्रीमती. हारुबाई शिवाजी हरगुडे,उद्योजक दगडू हनुमंत दरेकर,जावई साहेबराव कारभारी साकोरे, यांच्या भाऊ,पुतणे, सूना, नातवंडे असा मोठा गोतावळा आहे.