सणसवाडी येथे मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सवाचे आयोजन

Swarajyatimesnews

सांस्कृतिक,धार्मिक, खेळ पैठणीचा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करत महिलांच्या व भाविकांचे रेड कार्पेटवर स्वागत तर महिलांच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे व स्वयंसेवक

कोरेगाव भीमा – सणसवाडी (ता. शिरूर) येथील  मयुरनगर आयोजीत दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यक्रमांची विविध समाजोपयोगी उपक्रमांनी व सामाजिक बांधिलकी   जपत साजरा करण्यात येणार असून यावेळी विविध सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजन व खेळ पैठणीचा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मनसे पुणे जिल्हाध्यक्ष व मंडळाचे आधारस्तंभ रामदास दरेकर व मंडळाचे संस्थापक व पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य  पंडित दरेकर यांनी दिली.

 दुर्गामातेची मुर्तिस्थापना व घटस्थापना माजी पंचायत समिती सदस्या सविता दरेकर, माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर, सणसवाडी ग्राम पंचायतीच्या माजी सदस्य सुनीता उत्तम दरेकर, ग्राम पंचायत सदस्या  ललिता बाळकृष्ण दरेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

    नवरात्रोत्सवात सोनुचा नदा नाय करायचा,  होम मिनिस्टर हा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम अश्विनी सर्डीकर सादर करणार असून यावेळी महिला भगिनींना प्रथम क्रमांकास एल सी डी टिव्ही व पैठणी साडी, द्वितीय क्रमांक बजाज कुलर,तृतीय क्रमांकासब ओव्हन, चतुर्थ क्रमांकास टेबल फॅन, पाच्वया क्रमांकास इस्त्री, तर बारामतीकर ज्वेलर्स अशोक ढेकळे यांच्या वतीने नथ ,पैंजण,जोडवी, चांदीचा छल्ला, चांदीचा शिक्का अशी बक्षिसे ठेवण्यात आली असून प्रत्येक सहभागी स्पर्धकाला मंडळाच्या वतीने आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहे.

        आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये संगीत महाल, स्वप्न तारका, रंग नवा ढंग नवा, ऑर्केस्ट्रा मेलडी क्लासिक, ह्या लावणीचा भडका कॉमेडीचा तडका, सिनियर ईश्वर जादुगार, एकापेक्षा एक अप्सरा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भव्य दिव्य आहे जंगी विसर्जन मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे.

    या नवरात्र उत्सवात   राजकीय,प्रशासन, सामाजिक व पत्रकार अशा विविध क्षेत्रातील क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती करण्याचा मन देण्यात येणार असून असून त्यांच्या कार्याला अनोख्या पद्धतीने गौरविण्यात येणार आहे.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी ची कॅमेरे व स्वयंसेवक – नवरात्री उत्सवाच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या महिला भगिनींच्या सुरक्षिततेसाठी मंडळाच्या वतीने सी सी टी ची,स्वयंसेवक अशी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

भव्य मंडप व भाविक भक्तांसाठी रेड कार्पेट –धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमातही ३० बाय ५० चा भव्य मंडप व आकर्षक स्टेज साकारण्यात आले आहे यावर आकर्षक विद्युत रोषणाई व साऊंड सिस्टीम लावण्यात आली आहे. 

भाविकांसाठी टाकण्यात आले रेड कार्पेट – नवरात्री कार्यक्रमासाठी व देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी रेड कार्पेट टाकण्यात आले असून सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी महिला व पुरुष असे दोन विभाग करण्यात आले आहेत तसेच बॅरीगेट व्यवस्था करण्यात आली असल्याने मोठ्या प्रमाणात सुरक्षिततेच्या वातावरणात भाविकांना धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे.

या नवरात्रोत्सवात विवीध सांस्कृतीक कार्यक्रमांचे उत्कृष्ट आयोजन व नियोजन करण्यात आले होते. आकर्षक रोषणाई, भव्य मंडप, स्टेज, साऊंड व्यवस्था व महिला व बालकांच्या  सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आल्याने हा उत्साव महत्त्वपूर्ण ठरला.

 दुर्गामाता माता नवरात्रोत्सव मंडळाचे संस्थापक पंडीत  दरेकर व आधारस्तंभ रामदास दरेकर यांचे मार्गदर्शनाखाली अध्यक्ष लक्ष्मण दरेकर, उपाध्यक्ष अशोक करडे यांनी संचालक मंडळाच्या सहकार्याने सर्व उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात येणार आहेत.

माजी आमदार अशोक पवार यांचा सर्वात मोठा बॅनर –  सणसवाडी ग्रामस्थ व माजी आमदार अशोक पवार यांचे जिव्हाळ्याचे नाते असून येथील नागरिक व माजी आमदार पवार हे नेहमीच चर्चेचा विषय असतात.येथे नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमस्थळी भला मोठा आमदार अशोक पवार यांचा बॅनर , स्टेजच्या बाजूला असणारा उंच बॅनर,चौकात ठिकठिकाणी लावलेले भाविक भक्तांच्या स्वागतासाठी माजी आमदार अशोक पवार व कार्यकर्त्यांचे बॅनर हे मात्र वातावरण निर्मिती करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!