वडगाव रासाई येथे स्नेहपूर्ण भेट; ग्रामस्थांनी जपला आत्मीयतेचा बंध, माजी आमदार दाम्पत्यासोबत सरजा करून पाडवा जपला नात्यातील निरपेक्ष गोडवा
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) —जनसेवा आणि विकास यांच्या संगमातून शिरूर-हवेली मतदारसंघाला उजळवणारे माजी आमदार ॲड. अशोक पवार यांना सणसवाडी ग्रामस्थांनी दिवाळी पाडव्यानिमित्त स्नेहपूर्ण शुभेच्छा दिल्या. वडगाव रासाई येथील त्यांच्या निवासस्थानी ग्रामस्थांनी भेट देत आमदार दांपत्याशी आत्मीय संवाद साधला आणि अनेक वर्षांपासून जपला जाणारा स्नेहबंध अधिक दृढ केला.

माजी सभापती सुजाता पवार यांना ग्रामस्थांनी शुभेच्छा देताना परिसरात उत्सवी आणि आनंदी वातावरण निर्माण झाले. आमदार पवार यांनी देखील सणसवाडीकरांचे मनःपूर्वक स्वागत करून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या स्नेहभेटीवेळी दिवाळी फराळ आणि संवादाचे सुंदर वातावरण निर्माण झाले होते.

सणसवाडी गाव आणि अशोक पवार यांचे नाते हे केवळ राजकीय नाही तर मनाचे आहे. विकासकामांच्या माध्यमातून त्यांनी शिरूर-हवेली मतदारसंघातील प्रत्येक नागरिकापर्यंत सुखसुविधा पोचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच सणसवाडीकरांचे त्यांच्यावरचे प्रेम आणि विश्वास कायम अबाधित आहे.यावेळी सणसवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
