उत्कृष्ट माहिती अधिकार कार्यकर्ता पुरस्काराने खंडू गव्हाणे व राहुलकुमार अवचट सन्मानित
दि.१८ ऑगस्ट – माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या राज्यव्यापी अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी माहिती अधिकार क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले. डिंग्रजवाडी (ता. शिरूर ) येथील खंडू गव्हाणे व यवत येथील राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार कार्यकर्ता २०२४ चा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
राळेगणसिद्धी येथील महा अधिवेशनाची सुरुवात ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे,माहिती अधिकार अभ्यासक सजग नगरी मंचाचे विवेक वेलणकर, यशाचे दादू बुळे,तज्ञ प्रशिक्षक रेखा साळुंखे आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
माहिती अधिकार कायद्याच्या प्रचार, प्रसार जास्तीत जास्त वापर नागरिकांनी करावा अंमलबजावणीसाठी निस्वार्थ भावनेने यापुढे देखील प्रयत्नशील राहुन कार्य करेन असे राज्यभरातील कार्यकर्त्यांना खंडू गव्हाणे यांनी आश्वासन दिले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या राज्य कार्याध्यक्ष शेखर कोलते , पुणे जिल्हाध्यक्ष राहुल बानगुडे, राहुल अवचट, रमेश बोराडे,डॉ वामन साळवे, अमित कांबळे, ॲड.स्वाती पवार, श्वेता रायकर व नोंदणीकृत ५९० पदाधिकारी उपस्थित होते