पत्नीने घेतला करंगळीचा चावा, लाटण्याने मारहाण, मिक्सरचे भांड्यानेही मारहाण करत नखाने ओरबाडले
पुणे शहरातील सोमवार पेठ भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीने मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत, या कारणावरुन पत्नीने पतीला बेदम मारहाण केली. या महिलेने लाटणं आणि मिक्सरच्या भांड्याने पतीला बेदम मारहाण केली, तसेच करंगळीचा चावा घेऊन नख देखील तोडले.यामुळे भयभीत झालेल्या नवऱ्याने पोलीस स्टेशन गाठत बायकोच्या विरोधात तक्रार नोंदवली.(A shocking news has come out from Somwar Peth area of Pune city. A wife beat her husband severely because he did not eat the broken gram. This woman beat her husband severely with a ladle and a mixer jar, and also bit off his little finger and broke his nail. Due to this, the husband, who was frightened, approached the police station and filed a complaint against his wife.)
या प्रकरणी सोमवार पेठ येथील अमोल सोनवणे (वय ४४, रा. सोमवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी त्याच्या चाळीस वर्षीय पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजता सोमवार पेठेतील घरात घडली. (Pune Crime Neww)
एक डिसेंबरला रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. तक्रारदाराने घरात मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत, या कारणावरून त्यांच्या पत्नीने शिवीगाळ करून त्यांना लाटण्याने तळ हातावर, डोक्यात, पाठीवर मारले. तक्रारदाराने पत्नीच्या हातातील लाटणे हिसकावून घेतले. त्यामुळे चिडलेल्या पत्नीने मिक्सरचे भांडे घेऊन दोन वेळा तक्रारदाराच्या डोक्यात मारले. स्वरक्षणासाठी दोन्ही हात वर करून डोके झाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी पत्नीने रागाच्या भरात पतीच्या हाताच्या करंगळीला चावून नख तोडले. तसेच, हाताच्या नखांनी तोंडावर, गालावर, डाव्या कानाच्या पाठीमागे तसेच पोटाला ओरखडले. या घटनेनंतर घाबरलेल्या पतीने पोलिसात धाव घेतली. पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगत तक्रार दाखल केली आहे.(Crime news)