तुर्कीच्या सफरचंदावर पुण्यात बहिष्कार; ‘Ban Turkey apple’ हा देशभक्तीचा ट्रेंड देशभरात गाजतोय!

Swarajyatimesnews

पुणे – भारतावर दहशतवादील हल्ला करणाऱ्या नापाक पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा देणाऱ्या तुर्कीये देशाला भारतातील व्यापाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर मिळालं आहे. पुण्यातील बाजारपेठांतील व्यापाऱ्यांनी तुर्कीयेहून येणाऱ्या सफरचंदावर बहिष्कार टाकत ‘बॅन तुर्कीये ॲपल’ हा देशभक्तीचा अनोखा आणि प्रभावी ट्रेंड सुरू केला आहे. हा निर्णय केवळ आर्थिक नव्हे, तर राष्ट्रीय अस्मितेच्या रक्षणासाठी उचललेलं एक अभिमानास्पद पाऊल ठरत आहे.(Pune traders boycott Turkish apples)

भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण वातावरणात जगातील अनेक देशांनी भारताच्या बाजूने पाठिंबा दिला, मात्र तुर्कीये मात्र पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहिला(Turkey supports Pakistan). अशा स्थितीत, पुण्यातील जागरूक व्यापाऱ्यांनी तुर्कीयेच्या सफरचंदांची खरेदी-विक्री थांबवत देशहितास प्राधान्य दिलं आहे. त्यांच्या या देशभक्तीपूर्ण भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे.

सध्या पुणे मार्केट यार्डात इराण, वॉशिंग्टन आणि न्यूझीलंडहून येणाऱ्या सफरचंदांना व्यापाऱ्यांनी प्राधान्य दिलं असून त्यांच्या मागणीत आणि किमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे. तुर्कीये सफरचंद तुलनेने स्वस्त असूनही, व्यापाऱ्यांनी त्यांचा लाभ नाकारून देशहितासाठी तोट्याचीही तयारी दाखवली आहे. ही बाब तुर्कीयेच्या कोट्यवधींच्या व्यापारावर परिणाम करणारी ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सध्या काश्मीरमध्ये तणावाच्या पार्श्वभूमीवर सफरचंदाची आवक कमी झाली असतानाही व्यापाऱ्यांनी तुर्कीयेच्या सफरचंदावर बहिष्कार टाकून देशाच्या बाजूने ठाम भूमिका घेतली आहे. त्यांच्या या कृतीने ‘व्यवसायही देशासाठी’ या तत्त्वाला खरी श्रद्धांजली वाहिली गेली आहे.

‘बॅन तुर्कीये ॲपल’ ही मोहीम केवळ एक ट्रेंड नसून, ती भारतीय जनतेच्या जागृत राष्ट्रभक्तीचे दर्शन घडवते. आता या मोहिमेचा विस्तार देशभरात होत असून अनेक शहरांतील व्यापाऱ्यांनीही तुर्कीयेच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे.(Turkey Apple ban in India)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!