आता पैशांमुळे कोणाचेही शिक्षण थांबणार नाही: ‘प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी’ योजनेद्वारे घरबसल्या मिळवा बिनव्याजी कर्ज!

Swarajyatimesnews

योजनेमुळे घरबसल्या, कुठल्याही हमीदाराशिवाय आणि मालमत्ता गहाण न ठेवता शैक्षणिक कर्ज मिळवता येते बँकेच्या फेऱ्या नाहीत, थेट पोर्टलवर अर्ज! 

चांगले शिक्षण मिळावे आणि चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा, हे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते. मात्र, अनेकदा आर्थिक अडचणींमुळे हे स्वप्न अपूर्ण राहते. आता ही अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना’ (PM VidyaLakshmi Yojana) सुरू केली आहे. या योजनेमुळे घरबसल्या, कुठल्याही हमीदाराशिवाय आणि मालमत्ता गहाण न ठेवता शैक्षणिक कर्ज मिळवता येते बँकेच्या फेऱ्या नाहीत, थेट पोर्टलवर अर्ज! – विद्यार्थ्यांना आता बँकेच्या हेलपाटे मारायची गरज नाही. केंद्र सरकारच्या pmvidyalaxmi.co.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुम्ही सहजपणे शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करू शकता. हे पोर्टल केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांनी संयुक्तपणे तयार केले आहे.

 या पोर्टलवर देशातील 38 बँका जोडल्या गेल्या असून, त्या एकूण 86 प्रकारचे शैक्षणिक कर्ज देतात.या योजनेंतर्गत देशातील टॉप 860 शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना बिनहमीशिवाय कर्ज मिळू शकते.

कोण अर्ज करू शकते आणि नियमावली काय?अर्जदार भारतीय नागरिक असावा.त्याने बारावी उत्तीर्ण केलेली असावी. मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा संस्थेत प्रवेश घेतलेला असावा.अर्जदाराला स्वतःच्या नावावर कोणतीही मालमत्ता नसली तरी कर्ज मिळण्याची शक्यता असते.

व्याजातही मोठी सूट – ‘प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजने’मुळे गरजू विद्यार्थ्यांना मोठा फायदा होतो:ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹ 4.5 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांच्या कर्जावरील संपूर्ण व्याज सरकार भरते. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ₹ 4.5 लाख ते ₹ 8 लाख दरम्यान आहे, त्यांना व्याजात 3% पर्यंत सूट मिळू शकते.जर तुम्ही ₹ 7.5 लाख पर्यंत कर्ज घेतले, तर त्यावर सरकारकडून 75% क्रेडिट गॅरंटी देखील दिली जाते.

  • ऑनलाइन अर्ज प्रक्रिया –शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आणि ऑनलाइन आहे:
  • 1.  pmvidyalaxmi.co.inया अधिकृत वेबसाइटवर जा.
  • 2.  ‘नोंदणी’ (Register) लिंकवर क्लिक करा.
  • 3.  तुमचे नाव, ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर टाकून नोंदणी करा.
  • 4.  तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर एक व्हेरिफिकेशन (verification) लिंक येईल, त्यावर क्लिक करून तुमचे खाते सक्रिय करा.
  • 5.  आता तुमच्या युझरनेम आणि पासवर्डने लॉगिन करा.
  • 6.  ‘कॉमन एज्युकेशन लोन ॲप्लिकेशन फॉर्म’ (CELAF) भरा.
  • 7.  तुम्ही एकाच वेळी तीन बँकांमध्ये अर्ज करू शकता.
  • 8.  सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज ‘सबमिट’ करा.अर्ज सादर केल्यानंतर, पुढील प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने केली जाते.

आवश्यक कागदपत्रे – अर्ज करताना तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतील: पासपोर्ट आकाराचा फोटो,आधार कार्ड किंवा पॅन कार्ड (किंवा इतर कोणतेही ओळखपत्र), तहसीलदाराने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचा दाखला (जर तुम्ही राखीव वर्गातील असाल), निवास प्रमाणपत्र,मागील वर्गाची गुणपत्रिका आणि अभ्यासाशी संबंधित इतर कागदपत्रे,कॉलेज प्रवेश पत्र किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र, रद्द केलेल्या चेक/पासबुकची प्रत,कॉलेज फी पावती किंवा फीचा संपूर्ण तपशील,EWS प्रमाणपत्र (जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील असाल)

या योजनेमुळे लाखो गरजू विद्यार्थ्यांना मदत मिळत असून, पैशाअभावी शिक्षण अर्धवट राहण्याचा प्रश्न दूर होतो आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा लाभ घ्यावा, अशी विनंती शिक्षण खात्याच्यावतीने करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेऊन आपले शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!