एकाच वेळी तीन परीक्षांमध्ये मिळवले नेत्रदीपक यश
पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील विद्यार्थिनीने नेत्रदीपक यश मिळवत राज्यातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या अभिरूप परीक्षेत जिल्ह्यात प्रथम व नॅशनल स्कॉलर सर्च एक्झामीनेशन(एन एस एस ई)) या परीक्षेत राज्यात ११ वी तर मंथन परीक्षेत राज्यात सातवी व जिल्ह्यात दुसरी क्रमांक मिळवून पिंपळे जगताप गावचे नाव राज्य स्तरावर झळकावले असून तिच्या या यशाबद्दल शिरूर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
पिंपळे जगताप येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीतील कुमारी प्रियल अशोक नाईकनवरे या विद्यार्थिनीने राज्यस्तरावर नेत्रदीपक कामगिरीसह पुणे जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवला असून गावच्या नवलौकिकात मोठी भर घातली असून पिंपळे जगताप गावाचे नाव शैक्षणिक क्षेत्रात राज्यस्तरावर नेले आहे.
पिंपळे जगताप येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्राम पंचायत सदस्य अशोक नाईकनवरे व सरपंच सोनल अशोक नाईकनवरे यांची कन्या प्रियल अशोक नाईकनवरे हिच्या या यशाबद्दल पिंपळे जगताप ग्रामस्थांसह शिरूर तालुक्यातून कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
प्रियल अशोक नाईकनवरे हिला अभिरूप परीक्षेत जिल्ह्यात प्रथम व नॅशनल स्कॉलर सर्च एक्झामीनेशन(एन एस एस ई) परीक्षेत राज्यात ११ वी तर मंथन परीक्षेत राज्यात सातवी व जिल्ह्यात दुसरी परीक्षेत जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका अनुराधा गट मॅडम व मुख्याध्यापक भोंगळे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तर गावचा कारभार पाहताना कुटुंबाचीही जबाबदारी समर्थ व यशस्वीपणे पार पडत सरपंच सोनल अशोक नाईकनवरे यांनी मुलीचा अभ्यास घेतला व नेत्रदीपक यश मिळविण्यात मोठे योगदान दिले.