पुण्याचे उपजिल्हाधिकारी रामदास हरिभाऊ जगताप यांच्या मातोश्री गजराबाई हरिभाऊ जगताप (वय- ९०) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.डॉ. शिवाजीराव हरिभाऊ जगताप यांच्या मातोश्री होत. त्यांच्यावर शनिवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील सामजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.
कै.गजराबाई हरिभाऊ जगताप त्यांच्या पश्चात बाबुराव गणपत जगताप , मुलगा उपजिल्हाधिकारी रामदास हरिभाऊ जगताप, डॉ. शिवाजीराव हरिभाऊ जगताप, मुलगी इंदुबाई गोपीनाथ राजे निंबाळकर, नंदाबाई छगनराव पवार, नातू प्रणव रामदास जगताप, कु.आदित्य शिवाजीराव जगताप ,कु. प्राजक्ता रामदास जगताप, कु.डॉ. निशिगंधा शिवाजीराव जगताप व आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे.