भयंकर! घरासमोर विष्ठा केल्याच्या वादात नऊ महिन्याच्या मुलावर कुऱ्हाडीने वार

Swarajyatimesnews

शेजाऱ्यांमधील वाद विकोपाला, आरोपी फरार

बेलापूरमध्ये एका ९ महिन्याच्या बाळावर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाळावर वार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. ९ महिन्यांचा चिमुकला गंभीर जखमी असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.(A shocking incident has come to light in Belapur where a 9-month-old baby was attacked with an axe. The accused fled the scene after attacking the baby. A case has been registered in the police station in this regard and a thorough search is underway for the accused. The 9-month-old baby is seriously injured and has been admitted to the hospital for treatment. The entire incident was captured on CCTV.)

 बेलापुर गावात महिला आणि एका इस्माच्या वादात त्या इसमाने महिलेवर कुऱ्हाडीने वार केला.सदर वार तिच्या नऊ महिन्याच्या मुलाच्या डोक्यासह,कपाळ व नाकावर लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. जखमी मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेमुळे बेलापुर गावात खळबळ उडाली आहे.

बेलापूर गावातील स्मशान भूमी समोरील एका झोपडपट्टीतील एक महिला व एका इसमात वाद होते. या आधीही त्यांचे अनेक खटके उडाले असून सदर इसमाने या याधी या महिलेला एका लोखंडी रॉड ने मारले असल्याची माहिती समोर येत आहे. २८ नोव्हेंबरला  या दोघात पुन्हा एकदा भांडण झाले.मात्र सदर भांडण हे २ वर्षीय मुलाने घरासमोर विष्ठा केल्याने म्हणून झाले असल्याचे कारण दीले आहे. 

दोन शेजाऱ्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादानंतर दोन्ही शेजाऱ्यात मोठं भांडण झालं. दोघांमधील वाद टोकाला पोहोचला. या वादादरम्यान, शेजारचा व्यक्ती दुसऱ्या बाजूला राहणाऱ्या शेजारच्याच्या घरात कुऱ्हाड घेऊन शिरला. त्यानंतर या शेजाऱ्याने रागाच्या भरात त्या घरातील ९ महिन्यांच्या चिमुकल्या बाळावर थेट कुऱ्हाडीने वार केला. या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाला. थोडक्यात चिमुकला बचावला आहे.

दरम्यान सदर आरोपीवर एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

चिमुकल्याच्या कपाळावर मोठी जखम – शेजारच्याने ९ महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात बाळाच्या कपाळावर गंभीर जखम झाली आहे. त्याच्या डोक्यापासून, कपाळावर आणि अर्ध्या नाकापर्यंत मोठी जखम झाली आहे. बाळाला कपाळावरुन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे.(Crime news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!