धक्कादायक ! रिक्षा चालकाच्या मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू

Swarajyatimesnews

कार रिक्षाला स्पर्श झाल्यावर सॉरी म्हणाले पण रिक्षा चालकाने पाठलाग करून केली मारहाण

बेळगाव – खडेबाजारमधील शिवानंद लॉजजवळ ही धक्कादायक घटना घडली. फोंडा मतदारसंघाचे माजी आमदार, लहू मामलेदार (वय ६९), कामानिमित्त बेळगावला आले असताना, त्यांच्या कारचा रिक्षाला स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना सॉरी म्हणत कार घेऊन निघून जाण्याचा निर्णय घेतला.

लॉजजवळ कार पार्किंग करत असताना रिक्षाचालकाने पाठलाग करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कारमधून उतरल्यावर दोघांमध्ये भांडण सुरु झाले. रिक्षाचालकाने केलेली बेदम मारहाणी दरम्यान, लॉजच्या पायऱ्या चढत असताना लहू मामलेदार अचानक कोसळून जागेच मृत्यू पावला.

पोलिसांनी रिक्षाचालकावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केले असून, मृत्यूचे नेमके कारण तपासणीत स्पष्ट केले जाणार आहे.

लहू मामलेदार हे २०१२ ते २०१७ या कालावधीत गोव्यात फोंडा मतदारसंघाचे आमदार होते. २०१७ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी तीन महिन्यांसाठी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे सदस्य म्हणून काम केले; डिसेंबर २०२१ मध्ये त्यांनी पक्ष सोडला आणि जानेवारी २०२२ मध्ये काँग्रेसमध्ये परत प्रवेश घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!