Category: ताज्या बातम्या
Here in this we are posting all the daily activities happen time to time.
नरेश्वर वस्ती येथे शिक्षणाचा ‘गव्हाणे पॅटर्न’ राबवत घडवणार विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य
कोरेगाव भीमाचे माजी सरपंच अमोल गव्हाणे व ग्राम पंचायत सदस्या जयश्री गव्हाणे यांच्याकडून नरेश्वर वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नवीन ‘बॅग,वह्या,’ वाटप तर शासनाची पुस्तके व गणवेश वाटप उत्साहात साजरा कोरेगाव भीमा (ता. शिरूर): “ग्रामीण भागातील प्रत्येक मुला-मुलीला दर्जेदार शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे, आणि हे हक्क त्यांना मिळवून देणे हे आपले सामाजिक कर्तव्य!”…
लोणीकंद पोलिस चौकीच्या हद्दीत बालकाश्रमातील शिपायाचा 10 व 11 वर्षाच्या दोन मुलांवर लैंगिक अत्याचार
लोणीकंद (ता.हवेली) पुण्यातील लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीतील एका बालकाश्रमात एक संतापजनक घटना घडली असून दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बालकाश्रमात शिपाई म्हणून काम करणाऱ्या रमेश दगडू साठे (वय 55, राहणार दत्तवाडी, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे.या घटनेमुळे लोणीकंद परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रमेश साठे…
संत कान्हुराज महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावाने पंढरपूरकडे रवाना
पालखी सोहळ्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष… केंदुर (ता.शिरूर) संतश्रेष्ठ कान्हुराज पाठक महाराज यांच्या पालखी सोहळ्याने आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षात दिमाखाने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’, ‘श्री ज्ञानदेव तुकाराम’, ‘कान्हुराज महाराज की जय’ अशा अखंड जयघोषात, टाळ-मृदंगांच्या निनादात, कपाळी गोपीचंद टिळा, गळ्यात टाळ, मुखात नाम आणि डोळ्यांत पंढरीच्या भेटीची असीम ओढ घेऊन हजारो वारकरी भक्तांच्या उत्स्फूर्त…
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
आळंदी ( ता. खेड) संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी भक्तीचा अनोखा साज चढला आहे! नांदेड येथील निष्ठावान वारकरी, भारत विश्वनाथ रामीनवार यांनी आपल्या असीम श्रद्धेचे प्रतीक म्हणून आळंदी मंदिरास तब्बल एक किलो वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. या देदीप्यमान मुकुटाची अंदाजे किंमत सुमारे एक कोटी पाच लाख रुपये असून, रामीनवार यांच्या निःस्वार्थ सेवाभावाचा हा एक…
शिक्रापूर येथे फुलांच्या वर्षावात पहिलीतल्या चिमुकल्यांचे शाळेत स्वागत
“मुलं तुमची, झाडं आमची” उपक्रमाने पालकही आनंदी शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पी.एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक १६ जून २०२५ रोजी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. बालचमु आनंदाने शाळेत दाखल होताना पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने सुवासिनींनी ओवाळून करण्यात आले. फुलांच्या वर्षावात आणि वाद्यांच्या गजरात विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला….
Jejuri Accident : जेजुरी-मोरगाव रोडवर भीषण अपघातात आठ ठार, पाच जण गंभीर जखमी
जेजुरी – जेजुरी-मोरगाव रोडवरील श्रीराम ढाब्याजवळ रविवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातात मृत झालेल्यांमध्ये ढाब्यासमोर उभे असणारे व टेम्पोमधील साहित्य उतरवणारे नागरिक आणि स्विफ्ट डिझायर कारमधील प्रवासी यांचा समावेश आहे. पुण्याहून मोरगावकडे भरधाव वेगाने निघालेली स्विफ्ट डिझायर कार (MH 42 AX…
संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या हजारो दिंड्या आणि मानाच्या पालख्यांसह वारकरी विठुनामाचा गजर करत पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. यंदा ६ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने, विठ्ठलाच्या भेटीची आस घेऊन वारकऱ्यांची पायी वारी सुरु झाली आहे. ऊन, पाऊस, वादळ, वाऱ्याची तमा न बाळगता वारकरी आपल्या लाडक्या बा विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुरतेने वाटचाल करत आहेत. पंढरीच्या वारीसाठी महाराष्ट्राच्या विविध…
द टाटा पॉवर कंपनी लि. चे ७/१२ वरील नाव कमी करणे प्रकरणी मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले निलंबित
७/१२ उताऱ्यात अनधिकृत फेरफार केल्याप्रकरणी कारवाई पुणे, १७ जून २०२५: मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले यांना ७/१२ उताऱ्यात अनधिकृत फेरफार केल्याप्रकरणी राज्य सरकारने तात्काळ निलंबित केले आहे. द टाटा पॉवर कंपनी लि. चे नाव कमी करून त्याऐवजी धोंडू गोपाल ढोरे यांचे नाव मालकी हक्कासाठी नोंदवण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महसूल विभागाने ही कारवाई केली आहे. या निलंबनामुळे…
ऑनलाईन रम्मीच्या नादाने कर्जबाजारी,जमीन, घर गेले अखेर पत्नी व दोन वर्षांच्या लेकराची हत्या करत संपवलं जीवन
अख्ख कुटुंब संपलं; धाराशिवमधील मन सुन्न करणारी घटना धाराशिव तालुक्यातील बावी गावात ऑनलाईन रम्मीच्या नादातून कर्जबाजारी झालेल्या 30 वर्षीय तरुणाने पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. लक्ष्मण मारुती जाधव (वय 30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, त्याने तीन वर्षांपूर्वी तेजस्विनीशी प्रेमविवाह केला होता. त्यांना शिवांश नावाचा दोन…
नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये मृत्यू; गॅस गिझरच्या गळतीमुळे दुर्दैवी अंत…
आजरा शहरात एका नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गॅस गिझरमधून झालेल्या वायू गळतीमुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सागर सुरेश करमळकर (वय ३२) आणि सुषमा सागर करमळकर (वय २६) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. अवघ्या महिन्याभरापूर्वीच त्यांनी विवाह केला होता. काही दिवसांपूर्वी हे दाम्पत्य आंबोली येथे फिरायला…
