जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी येथे एका लग्नघरात बुधवारी पहाटे चित्तथरारक घटना घडली. दौलत खंडागळे यांच्या मुलाच्या लग्नासाठी घरी नातेवाईक आणि पाहुण्यांची मोठी गर्दी झाली होती. सर्वजण लग्नाच्या तयारीत मग्न असतानाच घराजवळ लावलेल्या पिंजर्यात अचानक बिबट मादी अडकली. पहाटे चार वाजता या प्रकाराचा उलगडा झाल्याने घरातील आणि पाहुण्यांच्या आनंदाच्या वातावरणात भीतीचे वातावरण पसरले. घटना कळताच वन विभागाला तातडीने माहिती देण्यात आली.(A heart-wrenching incident took place at a wedding house in Manjarwadi, Junnar taluka, on Wednesday morning. A large crowd of relatives and guests had gathered at the house for the wedding of Daulat Khandagale’s son. While everyone was busy preparing for the wedding, a female leopard suddenly got stuck in a cage near the house. The incident came to light at 4 am, causing panic among the happy family and guests. The forest department was immediately informed as soon as the incident was reported.)
उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. अंदाजे दोन वर्षांची बिबट मादी सुरक्षितपणे ताब्यात घेऊन तिला माणिकडोह बिबट निवारण केंद्रात हलविण्यात आले. वन विभागाने 15 दिवसांपूर्वीच या भागात पिंजरा लावला होता. या योजनेमुळे बिबट मादी जेरबंद झाल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला आहे.
मात्र परिसरात अजूनही बिबट्यांचा वावर असल्याची शक्यता वर्तवली जात असून नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वन विभागाच्या या यशस्वी कारवाईत ग्रामस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बिबट्याचा धोका टाळत कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला, यासाठी गावकऱ्यांनी वन विभागाला सहकार्य केले. या घटनेमुळे वन्यजीव आणि मानवी वस्त्यांमधील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.