Category: Latest Update
धक्कादायक! पतीच्या आत्महत्येने निराशेमध्ये पत्नीने चार वर्षांच्या मुलीसह केली आत्महत्या
घाटणे (ता. माढा): गावातील हरिभाऊ जानू लोंढे (वय ३५) यांनी गुरुवारी (दि. ६) गळफास लावून आत्महत्या केली. पतीच्या मृत्यूनंतर निराश झालेल्या त्यांच्या पत्नी जनाबाई लोंढे (वय ३२) यांनी ४ वर्षांच्या मुलीसह सार्वजनिक विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.ही घटना रविवारी (दि. ९) सकाळी उघडकीस आली. एकाच कुटुंबातील तिघांनी आपले जीवन संपवल्याने गावात शोककळा पसरली आहे. हरिभाऊ…
पुण्याचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांना मातृशोक
पुण्याचे उपजिल्हाधिकारी रामदास हरिभाऊ जगताप यांच्या मातोश्री गजराबाई हरिभाऊ जगताप (वय- ९०) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.डॉ. शिवाजीराव हरिभाऊ जगताप यांच्या मातोश्री होत. त्यांच्यावर शनिवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील सामजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. कै.गजराबाई हरिभाऊ जगताप त्यांच्या…
कोरेगाव भीमा येथे ऊस पाचट व्यवस्थापन व नैसर्गिक शेती कार्यशाळा उत्साहात संपन्न
ऊसाचे पाचट हे सोन्यासारखे असून त्याचा योग्य वापर केल्यास जमिनीची सुपीकता वाढवता येते – विकास चव्हाण दिनांक १० फेब्रुवारी कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, ग्रामपंचायत कोरेगाव भीमा आणि विविध विकास कार्यकारी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस पाचट व्यवस्थापन व नैसर्गिक शेतीवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी शेतकऱ्यांनी शेती विषयक विविध विषयांचे…
पुण्यातल्या आजोबांचा नादच खुळा ! नातवंडांच्या वाढदिवसाला ठेवला रघुवीर खेडकरांचा तमाशा
पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यात एका आजोबांनी आपल्या नातवांसाठी चक्क महाराष्ट्रातील सगळ्यात महागडा तमाशा बूक केल्याची घटना समोर आली आहे. नातवांच्या वाढदिवसाचा उपक्रम म्हणून त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.पण अशाप्रकारे वाढदिवासाठी आजोबांनी तमाशा बूक केल्यानं परिसरात एकच चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी तमाशासाठी दीड लाख रुपये खर्च केल्याने आजोबांच्या या दिलदारपणाचं सर्वत्र कौतुक होत आहे….
जेजुरी देवदर्शनाहून परतणाऱ्या डॉक्टर बहिण भावाचा अपघातात मृत्यू ; तर डॉक्टर नवदाम्पत्य गंभीर जखमी
बीड जिल्ह्यातील अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात डॉक्टर बहीण-भावाचा मृत्यू झाला तर . डॉकटर नवदाम्पत्य गंभीर जखमी झाल्याची ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.डॉ. ओम ज्ञानोबा चव्हाण आणि त्यांची चुलत बहीण डॉ. मृणाली शिंदे अशी मृतांची नावे आहेत. मानवत तालुक्यातील वझुर बु. येथील हे दोघे डॉक्टर जेजुरी येथे खंडेरायाचे दर्शन घेऊन परतत होते. कार (एम.एच.२२, ए.एम.४७५१)…
शिक्रापूर ग्राम पंचायतीच्या वतीने ‘होम मिनिस्टर’ खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
महिला आरोग्य शिबीर, व्याख्यान, रोजगार मार्गदर्शन व विविध महिला स्पर्धांचे आयोजन शिक्रापूर (ता.शिरूर) येथे आदर्श सरपंच रमेश गडदे व सर्व ग्राम पंचायत सदस्यांच्या संकल्पनेतून मकर संक्रांतीच्या निमित्ताने आरोग्य शिबिरात महिला भगीनिंच्या आरोग्याची तपासणी व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबीर, व्याख्यान,होम मिनिस्टरयावेळी विजेत्या पाच महिला भगिनींना पैठणी, ओहन, मिक्सर, पंखा, इस्त्री,कुकर अशा बक्षिसांची…
भीषण अपघात: जुन्नरमध्ये ५० प्रवासी बसची स्टेरिंग मोडली, चालकाची केबिन झाली चक्काचूर..
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. पुणे नाशिक महामार्गावर एका खासगी बसने भरधाव वेगात येत एका कंटेनरला धडक दिली आहे.या अपघातात ४० ते ५० जण जखमी झाल्याची माहिती आहे. भल्या पहाटे ४ ते ५ च्या सुमारास हा अपघात घडले. यावेळी बसमधून प्रवास करणारे प्रवासी साखर झोपेत होते. याचवेळी हा अपघात…
शरीरसौष्ठव स्पर्धेत राहुल कांबळे ‘महावितरण श्री’
अतितटीच्या लढतींमुळे राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेला मोठा प्रतिसाद बारामती – दि. ६ फेब्रुवारी वीजसेवेच्या धकाधकीचे दैनंदिन कामकाज सांभाळून शरीराला सुडौल व सुबद्ध आकार देत शरीरसंपदा कमावणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रेक्षकांची मने जिंकत वाहवा मिळवली. यात कोल्हापूर परिमंडलाचे राहुल विजय कांबळे यांनी पहिला ‘महावितरण श्री’चा किताब पटकावला. दरम्यान, बारामती येथील विद्यानगरी प्रतिष्ठानच्या क्रीडा संकुलात…
धक्कादायक ! कोरेगाव भीमामध्ये पोलिसांनी रोखला अल्पवयीन मुलीचा बालविवाह
कोरेगाव भीमा ता. शिरूर येथे एका सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिक्रापूर पोलिसांचे पथक तसेच ग्रामविकास अधिकारी यांनी बालविवाह रोखत अल्पवयीन युवतीची होणाऱ्या बालविवाहातून सुटका करत पालकांना समज दिली आहे. कोरेगाव भीमा ता. शिरूर येथे एका सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीचा तिचे पालक सदर युवती अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील ३ फेब्रुवारी…
वढू बुद्रुक येथील सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
दिनांक २ फेब्रुवारी -: वढू बुद्रुक (ता.शिरूर) माहेर संस्थेचा २८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात परदेशी पाहुण्यांनी आणि माहेरच्या मुलांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली. यानंतर मुलांनी आपले विविध नृत्यप्रकार सादर करत उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमाची सुरुवात आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते वृक्षांना पाणी घालून करण्यात आली. प्रमुख पाहुण्या…
