श्रीराम जयंती निमित्त यज्ञाला बसल्या १५१ जोड्या
कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील अखिल कोरेगाव भीमा समस्त नागरिकांच्या व युवकांच्या समन्वयातून शिरूर तालुक्यातील व पुणे जिह्यातील ग्रामीण भागात नावाजलेली व भक्तिभाव पूर्ण शिव महापुराण कथेचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले असून पहिल्या दिवशी प्रभू श्रीराम यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आलेल्या यज्ञाला १५१ जोड्यांच्या हस्ते संपन्न झाला. या यज्ञाचे पौरोहित्य व मार्गदर्शन ह.भ.प.श्रीनिवास दादा जोशी व श्रीपती नाना जोशी यांनी केले.

कोरेगाव भिमा येथे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील श्रद्धा व भक्तिभावपूर्ण नावाजलेली व शिरूर तालुक्यासह पंचक्रोशीतील नागरिकांना भावलेली भागवत कथा आयोजन केले जाते.मागील चार वर्षांपासून गावातील युवकांनी चालवलेल्या या धार्मिक उपक्रमाने कोरेगाव भीमा पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी गर्दी या कार्यक्रमास होत असते. यावर्षी शिव महापुराण कथेचे आयोजन दि.६ एप्रिल प्रभू श्री राम जयंती ते दि.१२ एप्रिल श्री हनुमान जयंती या सप्ताहात करण्यात आले असून कथा श्रीजी धाम राष्ट्रीय प्रवक्ते संतोषानंद महाराज हे कथा सांगणार आहेत. यासाठी भव्य स्टेज, आकर्षक रोषणाई, उत्तम साउंड व्यवस्था ,शिस्तबद्ध बैठक व्यवस्था असून काल्याच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिव महापुराण कथेतील धार्मिक कथेनुसार दररोज धार्मिक कथेनुसार वेशभूषा करण्यात येणार असून धार्मिक कथेची वातावरण निर्मिती होऊन प्रसंग भक्त व श्रोत्यांच्या मनात प्रत्यक्ष कथा उभी करतो यामुळे भाविक भक्त आणखी मंत्रमुग्ध होतात.

यावेळी कोरेगाव भिमा पंच क्रोशीतील भाविक भक्त कथेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून या कथेचे आयोजन करण्याचे हे चौथे वर्ष असून मागील कथा रामायणाचार्य, भागवताचार्य साध्वी वैष्णवी दीदी सरस्वती यांनी केले होते.
सदर भक्तिमय कथांचे आयोजन कोरेगाव भीमा येथील शांतता, सामाजिक व धार्मिक एकता व बंधुता यांचे उत्तम समरसता असणारे उदाहरण असल्याचे दिसून येते आहे.