कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील गफूरभाई इनामदार (वय ८० वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांचा गावातील विविध सामाजिक व धार्मिक क्षेत्रात नेहमी सहभाग असायचा.
कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य समीर इनामदार, व शकील इनामदार यांचे वडील तर उद्योजक अमीर इनामदार, माजी ग्राम पंचायत सदस्य सिराज इनामदार यांचे बंधू तर डॉ.अझर इनामदार यांचे चुलते, असा मोठा परिवार असून गफूर इनामदार यांच्या निधनाने एक राजकीय व सामाजिक पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या पश्चात मुले,मुलगी, भाऊ,बहिणी, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.