कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने पुणे नगर रस्ता रोको आंदोलन 

Swarajyatimesnews

कोरेगाव भिमा – पेरणे फाटा (ता. शिरूर) येथे कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने अध्यक्ष सर्जेराव वाघमारे व सहकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले  आले.

याबाबत कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने पुणे  जिल्हा दंडाधिकारी सुहास दिवसे,पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपआयुक्त परीमंडल क्र. ४. पुणे शहर हिंमतराव जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांना निवेदन देण्यात आले असून त्यानुसार मा.सुप्रिम कोर्ट यांनी अब क ड वर्गीकरणाचा घेतलेला निर्णय त्वरीत मागे घ्यावा. २) दरवर्षी १ जानेवारी जयस्तंभ शौर्य दिना निमित्त नियोजना साठी बार्टी कडुन अंदाजे १० कोटी रुपयांच्या आसपास निधी दिला जातो. तो बार्टी कडुन न देता स्वतंत्र निधीची व्यवस्था करण्यात यावी. ३) मागील ११ वर्षापुर्वी जयस्तंभावर विज कोसळुन जयस्तंभाची हानी झाली आहे. आज रोजी पावसाचे पाणी जयस्तंभामध्ये शिरुन जयस्तंभ मोडकळीस आला आहे. तो त्वरीत दुरुस्त करण्यात यावा.

४) गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाप्रमाणे १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगांव भिमा येथे झालेल्या दंगलीतील व २ जानेवारी २०१८ भारत बंद च्या वेळेस झालेले बौध्द समाज व मराठा समाज अंदाजे एकुण ३४,००० बांधवावर दाखल झालेले गुन्हे त्वरीत मागे घेण्यात यावेत. ५) उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी १ जानेवारी २०१९ रोजी जयस्तंभ कोरेगांव भिमा येथे जयस्तंभ शेजारील खाजगी जमिन अधिग्रहण करुन जयस्तंभाच्या विकास कामासाठी १०० कोटी रुपयांची घोषणा केली होती. सदर रक्कम त्वरीत  जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे वर्ग करण्यात यावी. ६) छत्रपती संभाजी महाराज वढु बु. व तुळापुर तसेच ऐतिहासिक  जयस्तंभ पुणे दर्शन मध्ये सामाविष्ठ करावा व जयस्तंभासाठी स्वतंत्र पीएमपीएल ची बससेवा उपलब्ध करुन देण्यात यावी. ७) १ जानेवारी शौर्य दिना निमीत्त येणाऱ्या लाखो लोकांच्या वाहनांसाठी पार्किंगसाठी जागा आरक्षित करण्यात यावी. व लोकांना कायमस्वरुपी नागरी सुविधा (सुलभ शौचालय, पिण्याचे पाणी, निवासी व्यवस्था व इतर) उपलब्ध करुन देण्यात यावे. असे निवेदन देण्यात आले होते.

यावेळी कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे , नीलेश गायकवाड,हिरा वाघमारे,सागर गायकवाड,किरण वाघमारे,दिपांकर इंगोले,सचिन कडलक,राजाराम दगडे,संतोष निकाळजे,भूषण गायकवाड,मनोज शिरसथ यांच्यासह कार्यकर्ते यांच्या वतीने जयस्तंभ पेरणेफाटा येथे रास्ता रोको करण्यात आले.यावेळी लोणीकंद पोलीस चौकिकडून  बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!