कोरेगाव भीमा: येथील जुन्या जाणत्या पिढीतील आणि सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय असणारे हरिभाऊ दौलती ढेरंगे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. लिंब चौकातील हरिभाऊ ढेरंगे हे पंचक्रोशीतील एक प्रतिष्ठित उद्योजक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी लाकूड वखारीचा व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठी दर्जेदार कोंबड खत व शेणखत पुरवण्याचा व्यवसाय अत्यंत सचोटीने आणि आदर्शवत पद्धतीने उभा केला होता. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांना समाजात मोठा मान होता.
धार्मिक व सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा नेहमीच मोठा सहभाग असे. त्यांच्या निधनाने कोरेगाव भीमा परिसरातील एक जुनी आणि आदरणीय व्यक्तीमत्व हरपले आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक व धार्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या पश्चात मुलगा भाऊसाहेब हरिभाऊ ढेरंगे, भाऊ नारायण ढेरंगे, केरबा ढेरंगे, मारुती ढेरंगे, पुतणे गोरक्ष ढेरंगे, सुभाष ढेरंगे, कृष्णा ढेरंगे, संदीप ढेरंगे, दीपक गुलाब ढेरंगे, नवनाथ ढेरंगे, नातू शेखर दत्तात्रय ढेरंगे, गणेश ढेरंगे, ह.भ.प. शहाजी ढेरंगे, किरण ढेरंगे, विशाल ढेरंगे, निलेश सुभाष ढेरंगे, कार्तिक ढेरंगे, बहिणी, भाचे, सुना, नातवंडे, आप्तेष्ट, पाहुणे असा मोठा परिवार आहे.