भक्तिभाव, संघटन व सेवेमुळे साकोरे झाले जनतेच्या हृदयाचे किरण

Swarajyatimesnews

काशी-अयोध्या देवदर्शन यात्रेच्या दुसऱ्या रेल्वेला मायबाप जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद 

लोणीकंद (ता. हवेली) दि. १३ नोव्हेंबर : “सेवा हीच साधना आणि भक्ती हेच जीवनाचे सौंदर्य!” या भावनेचा  प्रत्यय  लोणीकंद-पेरणे परिसरातील मायबाप जनतेला आला आहे. पै. किरण संपत साकोरे यांच्या भक्ती, सेवा आणि समर्पणाच्या भावनेतून सुरू झालेल्या काशी-अयोध्या देवदर्शन यात्रेच्या दुसऱ्या रेल्वेला हडपसर रेल्वे स्थानकावरून आज सायं. ४.३० वाजता शुभारंभ होणार असून, या यात्रेला मायबाप जनतेचा उदंड प्रतिसाद लाभला आहे.

प्रदिप विद्याधर कंद यांच्याकडून यात्रेकरूंना शुभेच्छा ! : पुणे जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष तथा पी.डी.सी.सी.बँकेचे संचालक तर भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप विद्याधर कंद व आदींच्या मार्गदर्शनाखाली या देवदर्शन यात्रेचे आयोजन त्या सर्व लोणीकंद-पेरणे जि.प.गटातील विविध संस्थांचे पदाधिकारी,मान्यवर,तसेच ज्येष्ठांनी काशी विश्वनाथ-अयोध्या जाणाऱ्या यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या असल्याचे प्रदिपदादा कंद युवा मंच व पै.किरण साकोरे मित्र परिवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

भक्तीचा जयघोष  – लोणीकंद-पेरणेतून भाविकांचा ओघ : “हर हर महादेव!” “जय श्रीराम!”च्या घोषणांनी लोणीकंद-पेरणे परिसर आज भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. गावागावातून यात्रेकरूंना रेल्वे स्थानकापर्यंत नेण्यासाठी दुपारी १ वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालय चौकातून बससेवा सुरू करण्यात आली आहे. या यात्रेचे व्यवस्थापन इतके नियोजनबद्ध आहे की प्रत्येक यात्रेकरूला सुरक्षित, सोयीस्कर आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

भक्तिभाव, सेवा आणि समर्पणाचा त्रिवेणी संगम : ११ नोव्हेंबर रोजी लोणीकंद येथे पै. किरण साकोरे मित्र परिवार व प्रदिपदादा कंद युवा मंच यांच्या उपस्थितीत यात्रेपूर्व बैठक पार पडली. या बैठकीत यात्रेच्या सर्व तयारीचा आढावा घेण्यात आला.

 “ही यात्रा केवळ देवदर्शनासह  समाजात श्रद्धा, एकता आणि सेवाभाव जागवणारी असून काशी विश्वनाथ व प्रभू श्री राम यांच्या आशीर्वादाने विकासाच्या दृष्टीने टाकलेले पाहिले पाऊल असून लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास आणि प्रत्येक मायबाप जनतेची सर्वांगीण सेवा करणार आहे .” – पै. किरण संपत साकोरे 

या पवित्र यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजप पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप विद्याधर कंद, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदिप भोंडवे, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप, हवेली पंचायत समितीचे  माजी उपसभापती ज्ञानेश्वर वाळके, पुणे हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रविंद्र कंद, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर भुमकर, माजी उपसभापती संजीवनी कापरे आदींचे मार्गदर्शन लाभले.या सर्वांच्या शुभेच्छांनी यात्रेचा उत्साह आणखी द्विगुणित झाला असून, भाविक भक्तांमध्ये “किरण साकोरे म्हणजे सेवाभावाचे तेजोमय प्रतीक!” अशी भावना व्यक्त होत आहे.

श्रद्धा आणि समाजसेवेचा प्रवास : हडपसरहून धावणारी ही दुसरी रेल्वे केवळ धार्मिक प्रवास नाही, तर सामाजिक ऐक्य आणि आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक आहे. यात्रेतील प्रत्येक भाविक हा भक्तिभावाचा वाहक आहे. काशी विश्वनाथ व श्रीरामलल्ला यांच्या दर्शनातून यात्रेकरूंना भक्तीचा आनंद व समाधान लाभणार असून, पै. किरण साकोरे यांच्या समर्पणातून जनसेवेची प्रत्यक्ष सहवास मिळणार असून किरण साकोरे यांना जनसेवेची संधी मिळणार आहे.

प्रदिपदादा कंद युवा मंच व पै. किरण साकोरे मित्र परिवाराचा उपक्रम : या यात्रेचे नियोजन प्रदिपदादा कंद युवा मंच  व पै. किरण साकोरे मित्र परिवारbयांच्या माध्यमातून झाले असून, यात्रेच्या प्रत्येक टप्प्यावर स्वयंसेवक युवकांचे योगदान लक्षणीय आहे. भक्तांना सुरक्षित, सुसंघटित आणि उत्साहपूर्ण अनुभव देण्यासाठी सर्व स्तरावर व्यवस्था करण्यात आली आहे.

भक्तीचा दीप उजळणारा प्रवास : लोणीकंद-पेरणे गटातील या यात्रेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की “भक्ती आणि सेवा एकत्र आल्या की समाजात आशेचा आणि श्रद्धेचा प्रकाश पसरतो.”पै. किरण साकोरे यांच्या भक्तीचा हा प्रवास जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!