गंगा घाटावरील आरतीने किरण साकोरे यांनी भक्तांच्या मनात मिळवले अढळ स्थान

Swarajyatimesnews

भगवंता आमच्या किरणची सर्व स्वप्ने पूर्ण कर, भाविक भक्तांचा आशीर्वाद किरण साकोरेंच्या पाठीशी

गंगेच्या लहरींवर नाचला भक्तीचा प्रकाश, वाराणसीत आत्म्याचा भगवंताशी संवाद!” 

वाराणसी : ७ नोव्हेंबर,गंगेच्या लहरींवर नाचला भक्तीचा प्रकाश, शंखाचा गगनभेदी स्वर आणि डोळ्यांत दाटून आलेली समाधानाची ओल..लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील यात्रेकरूंनी पै. किरण साकोरे यांच्या नेतृत्वाखाली माता गंगेच्या आरतीचा आणि काशी विश्वेश्वरांच्या दर्शनाचा आज एक अद्वितीय, आत्मिक अनुभव घेतला. हा सोहळा केवळ धार्मिक यात्रा नसून, भक्ती, सेवा आणि समर्पण आधारित सामाजिक एकात्मतेचा उत्सव ठरला. यावेळी गंगा आरतीने मंत्रमुग्ध झालेल्या भक्त, माता भगिनींनी किरण साकोरे यांना भरभरून आशीर्वाद घेत भगवंता त्यांची सर्व स्वप्ने पूर्ण कर असा आशीर्वाद देत त्यांच्या सेवेचे कौतुक केले.

गंगेच्या लहरींवर नाचला भक्तीचा प्रकाश – गंगेच्या पवित्र तीरावरचा तो संधिप्रकाश. सूर्य अस्ताला जाताना सोनेरी किरणे गंगेच्या लहरींवर पसरले होते, आणि त्या प्रत्येक लहरी भगवंताच्या चरणांवर नतमस्तक झाल्यासारख्या भासत होत्या. घाटांवर शेकडो दिवे प्रज्वलित झाले आणि क्षणातच गंगेच्या काठी सृष्टी जणू प्रकाशमय स्वर्गात रूपांतरित झाली.

घंटांचा निनाद, शंखाचा गगनभेदी स्वर आणि आरतीच्या लयीत झुलणारे हजारो भाविक असा दिव्य अनुभव प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्शून गेला. पवित्र वस्त्रांतील पुरोहितांच्या हातात आरती फिरू लागली, आणि त्या कापराच्या ज्वालेतून निघालेल्या सुवासात भक्ती विरघळली. प्रत्येक आरतीच्या वर्तुळात श्रद्धेचा तेजोमय प्रकाश झळकला.

गंगेच्या किनारी उभ्या भक्तांच्या व  माता-भगिनींच्या चेहऱ्यावर भक्तीचे झळाळते तेज पसरले होते. काहींच्या ओठांवर प्रार्थनेचे कुजबुजणारे शब्द, काहींच्या डोळ्यांत दाटून आलेली ओल ती होती समाधानाची, आत्मसमर्पणाची. आरतीच्या लयीत त्यांच्या भक्तीचे सूर गंगेच्या प्रवाहात मिसळत होते, जणू आत्म्याचा भगवंताशी संवाद चालू होता.

आरतीचा गजर वाढताच वातावरणात नृत्य सुरू झाले. काही भाविक हात जोडून डोळे मिटून उभे राहिले, तर काही माता-भगिनी टाळी वाजवत जीवाची शिवाशी एकरूपता साधू लागल्या. भक्ताचे भगवंताशी असलेले निस्वार्थ नाते,प्रेम,  आत्म्याचा आनंद. शंख, घंटा आणि भजनांच्या सुरात वाराणसीचा प्रत्येक कण गात होता , “हर हर गंगे, हर हर महादेव!”

गंगेच्या प्रवाहात दीप सोडले गेले. त्या लहान लहान ज्योती लहरींवर नाचत पुढे सरकत होत्या, जणू प्रत्येक दीप एक प्रार्थना घेऊन पुढे जात होता. गंगेवर चमकणाऱ्या त्या ज्योती म्हणजे आशेचा, श्रद्धेचा आणि भक्तीचा तेजोमय प्रवाह होता.त्या क्षणी वाराणसीत स्वर्ग उतरल्यासारखे वाटत होते. भक्त आणि भगवंत यांच्यातील सीमारेषा मिटल्या होत्या. प्रत्येकाच्या हृदयात एकच भाव उसळला  “ही फक्त आरती नाही, ही आत्म्याची आराधना आहे; ही फक्त गंगा नाही, ती भगवंताच्या कृपेची जिवंत अनुभूती आहे.”या सेवाभावी धार्मिक यात्रेबरोबर भक्ती, सेवा, समर्पण आधारित सामाजिक एकात्मतेचा उत्सव होता. भक्ती आणि सेवेचा हा अद्वितीय संगम लोणीकंद-पेरणे गटातील लोकांच्या स्मरणात कायम राहील.

गंगेच्या किनारी उभ्या माता-भगिनींच्या चेहऱ्यावर भक्तीचे झळाळते तेज पसरले होते. काहींच्या ओठांवर प्रार्थनेचे कुजबुजणारे शब्द, काहींच्या डोळ्यांत दाटून आलेली ओल. ती होती समाधानाची, आत्मसमर्पणाची. आरतीच्या लयीत त्यांच्या ओंजळीतून अश्रू गंगेच्या प्रवाहात मिसळत होते, जणू आत्म्याचा भगवंताशी संवाद चालू होता.गंगेच्या प्रवाहात सोडलेले दीप लहरींवर नाचत पुढे सरकत होते, जणू प्रत्येक दीप एक प्रार्थना घेऊन पुढे जात होता. गंगेवर चमकणाऱ्या त्या ज्योती म्हणजे आशेचा, श्रद्धेचा आणि भक्तीचा तेजोमय प्रवाह होता.त्या क्षणी वाराणसीत स्वर्ग उतरल्यासारखे वाटत होते. भक्त आणि भगवंत यांच्यातील सीमारेषा मिटल्या होत्या.

भगवंता आमच्या किरणची सर्व स्वप्ने पूर्ण कर – 

प्रत्येकाच्या हृदयात एकच भाव उसळला  “ही फक्त आरती नाही, ही आत्म्याची आराधना आहे; ही फक्त गंगा नाही, ती भगवंताच्या कृपेची जिवंत अनुभूती आहे. आणि हे सर्व आम्हाला किरण साकोरे या आमच्या मुलामुळे लाभल्याने भगवंता त्याची स्वप्ने पूर्ण कर अशी आर्त विनवणी हृदयातून व्यक्त होत होती. पुणे येथून वाराणसीपर्यंतच्या रेल्वे प्रवासात  प्रदीप दादा कंद युवा मंच व पै. किरण साकोरे मित्र परिवार, स्वयंसेवक  आणि कार्यकर्त्यांनी कोणालाही काहीही कमी पडू दिले नाही. भोजन, निवास, आरोग्य आणि अन्य सेवा व्यवस्थेची उत्तम सोय करण्यात आली होती, ज्यामुळे यात्रेकरूंना केवळ भक्तीचा अनुभव घेता आला.

यात्रेत सहभागी झालेले भाविक या आयोजनाने अत्यंत प्रभावित झालेले दिसले. यात्रेकरूंनी सांगितले, “असे सुव्यवस्थित आयोजन आम्हाला यापूर्वी कधीच अनुभवले नव्हते. प्रत्येक यात्रेकरूची काळजी घेण्यात आली आणि आम्हाला निवांतपणे दर्शनाची संधी मिळाली.”

भगवंता डोळे भरूनिया पाहीन तुझे रूप – पै. किरण साकोरे व त्यांच्या सहपत्नी यांच्या हस्ते माता गंगेची आरती पार पडली. तसेच सर्व यात्रेकरूंचे काशी विश्वेश्वरांचे दर्शन सुव्यवस्थितपणे व निवांतपणे झाले.

“काशी कोटि कोटि तीर्थ सम, काशी सारे जगन्मय” या संतवाणीला सार्थक करणारा हा अनुभव लोणीकंद-पेरणे गटातील यात्रेकरूंना लाभला आहे. यात्रेकरूंनी अत्यंत प्रभावीत होऊन, भक्ती आणि सेवेचा हा अद्वितीय संगम कायम स्मरणात राहील, अशी भावना व्यक्त केली.काशी विश्वेश्वरांचे दर्शन आणि गंगा आरतीनंतर आता यात्रेकरूंचा पुढचा प्रवास अयोध्या प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी सुरू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!