कोरेगाव भिमा – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील किराणा व्यावसायिक किरण सुरेश कुलकर्णी (वय ४८) यांनी ११ जून रोजी केलेल्या आत्महत्येप्रकरणी ज्या ११ बेकायदा सावकारांवर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. त्या सर्वांना पुणे सत्र न्यायालयाने नुकतेच अटकपूर्व जामिन मंजूर केले. ( Crime News)
आम्ही व्यवसाय करून आमच्या कुटुंबांच्या उन्नती केलेल्या आहेत. नियमितपणे व्यावहारिक गोष्टींनुसार आम्ही २८ जून रोजी मयत किरण कुलकर्णी यांचेसह त्यांच्या कुटुंबीयांकडून एका जागेचे खरेदीखत केले. त्यानंतर १० दिवसांनी किरण बेपत्ता होतात आणि त्यांच्या आत्महत्येनंतर आम्ही बेकायदा सावकार म्हणून आमचे विरुध्द तक्रार दाखल होते, आमच्या मागील काही पिढ्यांनी कधी सावकारकी केली नसताना झालेला प्रकार आम्हा कुटुंबीयांवर अन्यायकारक असल्याचा तसेच या प्रकरणाचा संपूर्ण परिवाराला प्रचंड मनस्ताप व दुःख झाले असून न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असून संबधित प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच सत्य समाजासमोर येईल सुधाकर कांतीलाल ढेरंगे यांनी सांगितले.(Crime News)
मयत किरण सुरेश कुलकर्णी यांनी तब्बल ११ सावकारांच्या जाचाला कंटाळून १० जुलै रोजी आत्महत्या केली असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, वाडागाव, लोणीकंद, वाघोली आणि जातेगाव खुर्द येथील सर्व सावकारांची नावे लिहून त्यांचा प्रत्येकाचा व्याजाचा दरही लिहून ठेवला होता.
मात्र, याबाबत त्यांचे बंधू महेश कुलकर्णी हे फिर्यादी झाले व त्यांच्या फिर्यादीनुसार नवनाथ भंडारे, संतोष भंडारे, संदीप अरगडे (तिघेही रा. वढू बुद्रुक, शिरूर)सुधाकर ढेरंगे, कांतिलाल रामचंद्र ढेरंगे, अमोल गव्हाणे (तिघे रा. कोरेगाव भीमा, शिरूर), शांताराम सावंत (रा. वाडागाव, ता. शिरूर), अजय यादव, जनार्दन वाळुंज (रा.लोणीकंद, ता. हवेली), किशोर खळदकर जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर), मामा सातव (रा. वाघोली) या अकरा जणांवर बेकायदा सावकारकीचे व आत्महत्येस जबाबदार असल्याचे गुन्हे दाखल झाले.
गुन्हे दाखल झाल्यापासून हे सर्वजण फरार असताना या सर्वांनी पुणे सत्र न्यायालयात २३ जून रोजी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज ठेवला. पण न्यायालयाने हा निकाल ३१ तारखेपर्यंत राखून ठेवला होता. याच प्रकरणाची सुनावणी नुकतीच झाली त्यात न्यायालयाने वरील सर्व आरोपींना तपासकामी पोलिसांना सहकार्य करण्याच्या अटीवर अटकपूर्व जामिन मंजूर केला. या प्रकरणी सुधाकर व कांतिलाल ढेरंगे यांच्या वतीने ॲड सुधीर शहा, ॲड विजेंद्र बढेकर, ॲड. निखिल ढेरंगे आदींनी काम पाहिले तर फिर्यादीच्या वतीने ॲड. वाजिद खान यांनी काम पाहिले.
आम्ही व्यवसाय करून आमच्या कुटुंबांच्या उन्नती केलेल्या आहेत. नियमितपणे व्यावहारिक गोष्टींनुसार आम्ही २८ जून रोजी मयत किरण कुलकर्णी यांचेसह त्यांच्या कुटुंबीयांकडून एका जागेचे खरेदीखत केले. त्यानंतर १० दिवसांनी किरण बेपत्ता होतात आणि त्यांच्या आत्महत्येनंतर आम्ही बेकायदा सावकार म्हणून आमचेविरुध्द तक्रार दाखल होते, याचा संपूर्ण परिवाराला प्रचंड मनस्ताप व दुःख झाले. – सुधाकर कांतीलाल ढेरंगे
बेकायदा सावकारांमुळे माझ्या भावाचा मृत्यू झाल्याने ही लढाई मी शेवटपर्यंत लढणार आहे. याप्रकरणातील सर्व आरोपींना शिक्षा मिळाल्यावर हीच माझ्या भावाच्या आत्म्याला शांती आम्ही समजू – महेश कुलकर्णी