महिलांचे देवाला प्रार्थना, भगवंता ! आमच्या किरणची स्वप्ने पूर्णकर
हडपसर (ता.हवेली) – दिनांक १३ नोव्हेंबर लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण पै. किरण साकोरे यांनी हजारो भाविकांना काशी विश्वनाथ व अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी एकत्र आणत भक्तीसेवेचा अद्वितीय आदर्श घातल्याने काशी येथील विश्वनाथाचे व अयोध्या येथील मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या दुसऱ्या रेल्वेला मायबाप भाविक भक्तांनी उदंड प्रतिसाद दिला असून हडपसर येथील रेल्वे स्थानकावरून कशी अयोध्या देवदर्शन यात्रा रेल्वेला हिरवा झेंडा दाखवत मोठ्या भक्ती भावाच्या व उत्साहाच्या वातावरणात प्रस्थान करण्यात आले.
यावेळी पुणे हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रविंद्र कंद, माजी सरपंच श्रीकांत कंद, लोकनियुक्त सरपंच मंदाकिनी साकोरे, माजी उपसरपंच सोहम शिंदे, भाजपचे भाऊसाहेब झुरुंगे, गौरव झुरुंगे, निलेश कंद व इतर अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाचे कौतुक करताना लोणीकंदच्या माजी सरपंच मोनाली श्रीकांत कंद व माजी सरपंच लीना कंद यांनी यांनी सांगितले की,“सेवाभावी वृत्ती असलेल्या किरण साकोरे यांना मायबाप जनतेचा भरभरून आशीर्वाद मिळेल आणि जनतेची राजकीय स्वप्ने ते पूर्णत्वाला नेतील. अशा सद्भावना व शुभेच्छा व्यक्त केल्या l.
दुसऱ्या रेल्वेचे जयघोषात भव्य प्रस्थान – प्रदिपदादा कंद युवा मंच’ आणि ‘पै. किरण साकोरे मित्र परिवार’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काशी विश्वनाथ–अयोध्या देवदर्शन यात्रेची पहिली दुसरी रेल्वे १३ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता हडपसर रेल्वे स्थानकावरून जय श्रीराम आणि हर हर महादेवच्या गजरात रवाना झाली.

लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती : या वेळी लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील पै. किरण साकोरे, गटातील विविध गावांचे सरपंच-उपसरपंच, आजी-माजी सदस्य, संस्थांचे पदाधिकारी, तसेच हजारो यात्रेकरू उपस्थित होते.प्रदिपदादा कंद युवा मंच आणि पै. किरण साकोरे मित्र परिवाराचे कार्यकर्ते व्यवस्थापनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
यात्रेचा जयघोषात निनादले हडपसर स्टेशन – “हर हर महादेव!”, “जय श्रीराम!!” या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.पेरणे लोणीकंद जिल्हा परिषद गटातील गावांतून आलेल्या भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. अनेकांनी ही यात्रा “जीवनातील अविस्मरणीय आध्यात्मिक क्षण” असल्याची भावना व्यक्त केली.
गाडी चालली वळणावरी ग, त्याचा ड्रायव्हर राम कृष्ण हरी : यावेळी लोणीकंदच्या माजी सरपंच लीना कंद व माजी ग्राम पंचायत सदस्य सुरेखा कैलास कंद यांनी गाडी चालली वळणावरी ग त्याचा ड्रायव्हर राम कृष्ण हरी, गाडीमध्ये बसलय कोण, प्रदीप दादा ,किरण साकोरे गाडी चालली वळणावरी ग… अशा स्वरूपाच्या गाण्याने वातावरण मंत्रमुग्ध झाले होते तर काही महिला भगिनींनी टाळाच्या भजनी ठेक्यावर सुरेख अभंग, गवळणी म्हणत वातावरण भक्तिमय झाले होते.
“विकासाची गंगा लोणीकंद-पेरणे गटात आणणार” — “जनता जनार्दन रुपी मायबापांच्या आशीर्वादाने हे माझे स्वप्न पूर्ण होत आहे. काशी विश्वेश्वर आणि श्रीरामांच्या कृपेनेच लोणीकंद-पेरणे गटात विकासाची गंगा आणण्याचे माझे ध्येय आहे. ही यात्रा देवदर्शनासह संपूर्ण हवेली तालुक्यात भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचा संदेश पोहोचवणारी एक सुंदर ऋणानुबंध जोडणारी भावनिक एकरूपता ठरली आहे.”– पै.किरण संपतराव साकोरे
