पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची ध्येय एज्युकेशन फाउंडेशनने घेतली दखल
‘Ideal Journalist’ award
याप्रसंगी हडपसरचे आमदार चेतन तुपे,फाउंडेशनचे संस्थापक सुदाम शेंडगे,राज्य मार्गदर्शक सोमनाथ शिंदे,सहाय्यक पोलिस आयुक्त राहुल आवारे,योजना संचालनालयचे संचालक डॉ.महेश पालकर,पालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुरेखा भंगे,ध्येय प्रकाशन अकॅडमीच्या संस्थापिका अर्चना शेंडगे,सचिव सोनाली गाडे,राज्यप्रमुख संदीप पाटील,सारिका शिंदे,उर्मिला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
विजय लोखंडे यांनी गेल्या १८ वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचे प्रश्न, दुर्लक्षित घटकांचे प्रश्न आणि समाजातील विविध समस्यांना वाचा फोडली आहे. त्यांची निर्भीड लेखणी आणि सामाजिक बांधिलकी यामुळे अनेकांना न्याय मिळवून देण्यात यश आले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना याआधीही विविध आदर्श पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पूर्व हवेली परिसरात ‘स्टार पत्रकार’ म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
पुणे,हडपसर येथे ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार विजय लोखंडे यांना प्रदान करताना सहाय्यक कामगार आयुक्त अनिकेत थोरात,आदी मान्यवर.