Swarajyatimesnews

दुष्काळाला हरवणारा महाराष्ट्रातील अनोखा चमत्कार म्हणजे! पाणीदार केंदूर – अमेरिकेतील वॉटर फॉर पीपल सीईओ मार्क डूये

दिनांक २ मार्च केंदूर (ता. शिरूर) येथील जलआत्मनिर्भरतेसाठी सुरू असलेल्या पाणी पुनर्भरणाच्या प्रकल्पात चार वर्षांपूर्वी जलआरेखन करून गावातील जलस्त्रोत, जुने पाझर तलाव व तत्सम माहिती संकलित करणारे जलतज्ञ डॉ. सुमंत पांडे यांच्या टीमने गावाचा जलआराखडा तयार केला. या आराखड्यानुसार ३५०० हेक्टर परिसरातील जलस्तर सुधारून गावाला स्वावलंबी बनवण्याची दिशा आखली गेली.अनाई यातून महाराष्ट्रातील अनोखा चमत्कार घडला…

Read More
Swarajyatimesnews

दानशुरांनो चौदा वर्षीय समर्थला हवा मदतीचा हात 

लहान मुले खेळताना अनेकदा पडतात, धडपडतात, तर कधी छोटे अपघातही होतात. पण, जेजुरीतील समर्थ रणनवरे या चौदा वर्षीय मुलाला खेळताना झालेल्या अपघाताची आपण कल्पना करू शकत नाही. समर्थ मित्रांसमवेत बॅडमिंटन खेळत होता. बॅडमिंटनचे फूल समोरच्या घरावरील टेरेसच्या टोपीवर पडले. ते काढण्यासाठी गेलेल्या समर्थला उच्च दाबाच्या (३३ केव्ही) विजेच्या वाहिनीचा धक्का बसला अन् तो ५० टक्के…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! आळंदीत सर्पदंशाने सर्पमित्राचा मृत्यू

आळंदीतील सर्पमित्र राहुल उर्फ विकास मल्लिकार्जुन स्वामी (वय ३२) यांचा सर्पदंशामुळे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. गावात पकडलेल्या कोब्रा जातीच्या सापाला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यासाठी निर्जन स्थळी गेलेल्या स्वामी यांना सापाने दंश केला. दंशानंतर त्यांना तातडीने आळंदी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांचा मृत्यू…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! शाळकरी मित्रानेच केला मित्राचा खून; प्रेत सोयाबीनच्या गुळीत पुरले

औसा तालुक्यातील कमालपूर येथे किरकोळ वादातून एका शाळकरी मित्राने आपल्या मित्राचा धारदार शस्त्राने खून करून प्रेत शेतातील सोयाबीनच्या गुळीत पुरल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. रितेश गिरी (वय १४) असे मृत मुलाचे नाव असून, या प्रकरणात भादा पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. नारळ खाण्यासाठी गेलेल्या मित्रांत वाद – शनिवारी (ता. ११) सकाळी रितेश गिरी…

Read More
Searajyatimesnews

फुलगाव ग्रामस्थांचे रस्ता रोको आंदोलन, मुलीच्या अपहरण व हत्येप्रकरणी आरोपींना फाशीची मागणी

फुलगाव (ता. हवेली) येथे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या मुलीच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करत सदर आरोपींच्या गुन्ह्यातील कलमे वाढवण्यासह फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. दोन महिन्यांपूर्वी फुलगाव येथून एक मुलगी बेपत्ता झाली होती. तिच्या वडिलांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान तिची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात बालाजी हिंगे…

Read More
Swarajyatimesnews

वाघोलीतील बी.जे ल.एस. महाविद्यालयात ‘तंबाखू सेवनामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम व जनजागृती’ या विषयावर पोस्टर स्पर्धेचे उत्साहात आयोजन 

जिवंतपणी नका देऊ मृत्यूला आमंत्रण, करून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, यासह अनेक आकर्षक व हृदयस्पर्शी तंबाखूमुक्तीचे संदेश देत पोस्टर स्पर्धा साजरी  वाघोली :- दि. ३० डिसेंबर  भारतीय जैन संघटनेच्या कला विज्ञान व वाणिज्य  महाविद्यालयात एक समाजोपयोगी तसेचआजच्या काळात अत्यंत पथदर्शी व तरुणाईला व्यवसानांपासून दूर ठेवण्यासाठी तंबाखू सेवनामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम व जनजागृती या विषयावर …

Read More
Swarajyatinesnewd

वाघोली ही आई, शिक्रापूर माझी मावशी; शिक्रपुरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार – आमदार ज्ञानेश्वर कटके  

वाघोली (ता.हवेली) शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी आपल्या मतदारसंघातील समस्यांवर मार्ग काढण्यासाठी वाघोली येथे दिनांक २८ डिसेंबर रोजी जनता दरबाराचे आयोजन केले. यावेळी आमदार कटके यांनी वाघोली जरी माझी आई असली तरी शिक्रापूर माझी मावशी आहे, शिक्रापूर ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांच्या मागण्यांचा पाठ करत सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भिमा येथे सी सी टी व्ही फुटेजमध्ये आढळणारा प्राणी सिंह नव्हे तर  बिबट्याच – स्मिता राजहंस

कोरेगाव भीमा, ता. २० : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे गव्हाणे वस्तीवरील पोपट गव्हाणे यांच्या घरासमोर सिंह सदृश्य प्राण्याने पाळीव कुत्र्याची शिकार केल्याच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज वायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाने तातडीने पिंजरा लावत आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. दरम्यान वन विभागाने मात्र सीसीटीव्ही फुटेज नुसार हा सिंह नसून बिबट्याच असल्याचे…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! कोरेगाव भिमा येथे सिंह सदृश्य प्राण्याने केली कुत्र्याची शिकार…

सी सी टी व्ही फुटेज मध्ये सिंह सदृश्य प्राणी आढळल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे गव्हाणे वस्तीवरील पोपट गव्हाणे यांच्या घरासमोर सिंह सदृश्य प्राण्याने पाळीव कुत्र्याची शिकार केल्याचे सी सी टी व्ही मध्ये दिसत असल्याने नागरिकांमध्ये सिंहसारखा प्राणी आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने पिंजरा लावत संबधित प्राण्याला पकडण्याची…

Read More
Swarajyatimesnews

मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर! नव्या पिढीच्या हक्कांचा आदर करा – शांतीलाल मुथ्था

पुणे– “जैन समाजातील मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुलं वयाच्या २०व्या वर्षी पोहोचल्यावर त्यांना स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार दिला पाहिजे. मात्र, अट अशीच असेल की जोडीदार आपल्या समाजातीलच असावा,” असे मार्मिक आवाहन भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी केले.   पुण्यात आयोजित भारतीय जैन संघटनेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपाच्या सत्रात मुथ्था बोलत…

Read More
error: Content is protected !!