
महाराष्ट्राचे तीर्थस्थळ म्हणून श्री क्षेत्र वढू बुद्रुक करणार विकसित – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३६व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित धर्मसभेत वढू बुद्रुक हे महाराष्ट्राचे तीर्थस्थळ म्हणून विकसित करण्याची घोषणा केली आहे. तसेच, मृत्यूंजय अमावस्येच्या दिवशी, ज्यादिवशी छत्रपती संभाजी महाराज वीरगतीला प्राप्त झाले, त्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना दिले असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले….