
शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात तरुणाने पत्नी व मुलांसमोर घेतली झाडाला फाशी
पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात कौटुंबिक वादातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. ८) सायंकाळी घडली. सोहेल येनघुरे (वय २८, रा. पाषाण) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोहेल आणि त्याच्या पत्नीचे किरकोळ कारणांवरून वाद झाले होते. शनिवारी घरगुती भांडणानंतर सोहेलने पत्नीला घटस्फोटाची धमकी दिली. त्यानंतर पत्नी आणि दोन मुलांसोबत ते शिवाजीनगर…